रसायन आणि खते मंत्रालय

एचआयएल (इंडिया) इराणला टोळ नियंत्रण कीटकनाशके पुरविण्यासाठी सज्ज


या केंद्रीय पीएसयुच्या पत मानांकनात बीबी ते बीबीबी पर्यंत सुधारणा

Posted On: 24 MAY 2020 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2020

कोविड-19 लॉकडाऊन मुळे लॉजिस्टिक आणि इतर आव्हाने असताना देखील, रसायन आणि खत मंत्रालयाच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल विभागांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील एचआयएल (इंडिया) मर्यदीतने शेतकऱ्यांसाठी कीटकनाशकांचे वेळेवर उत्पादन आणि पुरवठा सुनिश्चित केला आहे.

एचआयएल आता सरकारच्या शासन व्यवस्थे अंतर्गत इराणला टोळ नियंत्रण कार्यक्रमाच्या पुरवठ्यासाठी 25 मे.टन मॅलेथिऑन टेक्निकल उत्पादन व पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणला वरील वस्तूंचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी एचआयएलकडे संपर्क साधला आहे.

एचआयएलच्या पत मानांकनात बीबी ते बीबीबी पर्यंत सुधारणा करण्यात आली आहे जी एक स्थिर गुंतवणूक श्रेणी आहे.

कंपनीने लॅटिन अमेरिका, पेरू या देशांना 10 मेट्रीक टन ‘मॅनकोझेब’ या बुरशीनाशकांची निर्यात केली असून पुढील आठवड्यात आणखी 12 मेट्रीक टन निर्यात करणार आहे.

एचआयएलने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाबरोबर टोळ नियंत्रण कार्यक्रमासाठी राजस्थान आणि गुजरातला मॅलेथिऑन टेक्निकल  पुरवठा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. एचआयएलने गेल्या आठवड्यापर्यंत 67 दशलक्ष टन मॅलेथिऑन तांत्रिक उत्पादन व पुरवठा केला होता

एचआयएलने डेंग्यू आणि चिकनगुनिया नियंत्रण कार्यक्रमासाठी महानगरपालिकांना मॅलेथिऑन टेक्निकल  पुरविले आहे.

कुटुंब कल्याण मंत्रालयाने एनव्हीबीडीसीपी कार्यक्रमांतर्गत पुरवठा संबंधित आदेशानुसार, राजस्थान, पंजाब, ओदिशा आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये 314 मेट्रिक टन डीडीटी 50% डब्ल्यूपीपी पुरवठा केला असून कंपनी उर्वरित 252 मे.टन दुसर्‍या राज्यात पुरवण्याच्या प्रक्रियेत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकरी आणि आरोग्य विभागाला अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून 15 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन कालावधीत एचआयएलने 120 मेट्रिक टन मॅलेथिऑन टेक्निकल, 120.40 मेट्रिक टन डीडीटी टेक्निकल, 288 मेट्रिक टन डीडीटी 50% डब्ल्यूपीडी, 21 एमटी एचआयएलगोल्ड (वॉटर सॉल्बल फर्टिलायझर), 12 मेट्रिक टन 'मॅन्कोझेब' बुरशीनाशक निर्यातीसाठी आणि 35 मेट्रिक टन विविध अ‍ॅग्रोकेमिकल फॉर्म्युलेशनचे उत्पादन केले आहे.

 

S.Thakur/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626572) Visitor Counter : 312