मंत्रिमंडळ
अडकलेल्या स्थलांतरितांना धान्य वाटपासाठी मंत्रिमंडळाने मंजूर केले‘ आत्मनिर्भर भारत पॅकेज’
Posted On:
20 MAY 2020 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2020
सुमारे 8 कोटी स्थलांतरितांना /अडकलेल्या स्थलांतरितांना दर महिन्याला माणशी पाच किलो याप्रमाणे दोन महिन्यांसाठी (मे आणि जून) मोफत धान्य केंद्राच्या कोट्यातून देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली.
यामुळे सुमारे 2982.27 कोटी रुपयांची अन्नधान्य सबसिडी देता येणार आहे. याखेरीज आंतर राज्य वाहतूक आणि हाताळणी यावर होणारा खर्च, वितरकाचा लाभ/अतिरिक्त वितरक लाभ यासाठी येणारा सुमारे 127.25 कोटी रुपये खर्च पूर्णपणे केंद्र सरकार करणार आहे. त्यानुसार भारत सरकारकडून दिली जाणारी एकूण सबसिडी अंदाजे 3109.52 कोटी रुपये आहे.
या धान्यवाटपामुळे कोविड 19 मुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या स्थलांतरित/ अडकलेल्या स्थलांतरितांना दिलासा मिळू शकेल.
****
B.Gokhale/ S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625339)
Visitor Counter : 293
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam