गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        अडकलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवासासंदर्भात एसओपी
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                19 MAY 2020 4:40PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 19 मे 2020
 
लॉकडाऊन उपाययोजनांसंदर्भातील 17-5-2020 ची सुधारित एकत्रित मार्गदर्शक तत्वे कायम ठेवत केंद्रीय गृह मंत्रालयाने, अडकलेल्या मजुरांना रेल्वेने ये-जा करता यावी यासाठी सुधारित एसओपी, मानक संचालन पद्धती जारी केली आहे.
यानूसार, अडकलेल्या मजुरांना रेल्वेने ये-जा करण्यासाठीची परवानगी याप्रमाणे-
	- रेल्वे मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालयाशी चर्चा करून श्रमिक विशेष गाड्यांना ये-जा करण्याची परवानगी देईल.
- सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नोडल अधिकारी नियुक्त करतील आणि अशा अडकलेल्या व्यक्तींना पाठवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करतील.
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आवश्यकता लक्षात घेऊन गाडीचा थांबा आणि ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थान यासह गाडीच्या वेळापत्रकाला रेल्वे मंत्रालय अंतिम स्वरूप देईल. हे वेळापत्रक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळवण्यात येईल ज्यामुळे अशा अडकलेल्या मजुरांना पाठवण्यासाठी आणि घेण्यासाची  योग्य व्यवस्था करता येईल.
- रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत प्रसिद्धी, प्रवेशासाठीचे आणि प्रवाश्यांच्या ये-जा करण्यासाठीचे नियम, रेल्वे डब्यात पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसमवेत तिकीट आरक्षण व्यवस्था रेल्वे मंत्रालय करेल.
- सर्व प्रवाशांची चाचणी (स्क्रीनिंग) अनिवार्य असून ते केल्याची खातरजमा मजुरांना पाठवणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि रेल्वे मंत्रालयाने करायची आहे. लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी आहे.
- गाडीत चढताना आणि प्रवासात सर्व प्रवाशांनी एकमेकांमध्ये योग्य अंतराचे पालन करायचे आहे.
- नियोजित स्थानी पोहोचल्यानंतर प्रवाश्यांना त्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्य नियमावलीला अनुसरावे लागेल.
 
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी केलेल्या संपर्काबाबत माहितीसाठी इथे क्लिक करा
 
* * *
S.Thakur/N.Chitale/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1625120)
                Visitor Counter : 351
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam