आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73व्या जागतिक आरोग्य परिषदेत झाले सहभागी


कोविड-19 व्यवस्थापनाच्या दिशेने भारताच्या वेळेवर, श्रेणीबद्ध आणि सक्रिय उपाययोजनांवर टाकला प्रकाश

Posted On: 18 MAY 2020 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  मे 2020

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आज नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73 व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी झाले. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालकांनी केलेल्या भाषणावर डॉ. हर्ष वर्धन यांनी भारताची दिलेली प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:

जागतिक आरोग्य परिषदेच्या अध्यक्ष महामहीम केवा बेन, डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस आणि मान्यवर,

सर्वप्रथम मी, कोविड-19 मुळे संपूर्ण जगभरात झालेल्या जीवित हानिबाद्द्ल तीव्र शोक व्यक्त करतो. जे लोकं आघाडीवर राहून ही लढाई लढत आहेत त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.

आम्ही, भारतामध्ये कोविड-19 च्या आव्हानाला राजकीय वचनबद्धतेच्या सर्वोच्च पातळीवर स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि या प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यास कोणतीही कसर राहू नये म्हणून वेळेवर, सक्रीय आणि श्रेणीबद्ध प्रतिक्रिया सुनिश्चित केल्या.

भारताने वेळेवर योग्य ती पावले उचलली, ज्यात प्रवेशाच्या ठिकाणी संनिरीक्षण करणे, परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी घेऊन येणे, निकोप आजार संनिरीक्षण ठेवण्याच्या नेटवर्कद्वारे मोठ्या प्रमाणात समुदाय संनिरीक्षण ठेवणे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, दोन दशलक्षांपेक्षा अधिक आघाडीच्या मनुष्यबळाची क्षमता वाढवणे, जोखीम संप्रेषण आणि समुदाय सहभाग याचा यात समावेश आहे. मला असे वाटते की आम्ही आमचे सर्वोत्तम कार्य केले आहे. आम्ही शिकत आहोत आणि आगामी काही महिन्यांमध्ये आम्ही अधिक चांगले काम करू यावर आमचा विश्वास आहे.

महामहीम, आज अशी परिस्थिती उद्भवली आहे की आपल्या सगळ्यांना अशा आभासी पद्धतीने भेटणे भाग पडले आहे. 73 वी डब्ल्यूएचए ही पहिलीच आभासी आरोग्य परिषद आहे, ती अभूतपूर्व आहे, परंतु कदाचित ही आतापर्यंतची सर्वात महत्वाची परिषद देखील आहे; कारण आपण येथे बसून चर्चा करीत असताना, देखील हा साथीच्या आजार हजारो लोकांचे जीव घेत आहे आणि यामुळे मोठ्याप्रमाणात जागतिक मंदीही उद्भवू शकते.

ही अशी वेळ आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीने एकत्र आले पाहिजे. मी सर्व सरकारे, उद्योग आणि मानव सौहार्द जपणाऱ्या लोकांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे हित सुनिश्चित करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या लाभाला प्राधान्य द्यावे आणि त्यांच्याकडील उपलब्ध स्रोतांचा सर्वतोपरी उपयोग करावा.

आम्ही आमच्या बाजूने द्विपक्षीय आणि प्रादेशिक भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने भारत महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. आमच्या पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली, भारताने ऐक्यभावना जपत 123 देशांना आवश्यक औषधे पुरविली आहेत.

या महामारीतून बाहेर पडण्यासाठी रोगनिदान, रोगचाचणी आणि लस हा एकमेव मार्ग आहे. जागतिक सहकार्य सर्वोपरि आहे. सरकारे, उद्योग आणि मानव सौहार्द जपणाऱ्या लोकांनी या आजारावर औषध किंवा लस कोठे विकसित होईल याची पर्वा न करता ते प्रत्येकासाठी उपलब्ध होईल या अटीवर जोखीम, संशोधन, उत्पादन आणि वितरणासाठी त्यांच्याकडील स्रोत उपलब्ध करून दिले पाहिजेत.

आज, या दोन दिवसाच्या चर्चेत आपण, जानेवारीपासून आतापर्यंत आपण या आपत्तीचा सामना कशाप्रकारे केला आहे, आपल्या काही सदस्य देशांमधील आर्थिक आणि तांत्रिक पोकळी भरून काढण्यासाठी आपण त्यांना कशाप्रकारे पाठिंबा देऊ शकतो हे येथे सामायिक केले पाहिजे आणि तडफदार आणि एकत्रित मार्गाने संशोधन आणि विकास कार्य सुरु ठेवण्यावर सहमती दर्शविली पाहिजे.

मानवतेला वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करताना, आंतरराष्ट्रीय संस्थांना 21 व्या शतकाच्या वास्तविकतेच्या प्रती अधिक चिंतनशील बनवण्याच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. भारत नेहमीच अर्थपूर्ण आणि व्यापक-स्तरावर बदल घडवून आणणाऱ्या अशा प्रयत्नांना पाठिंबा देईल.

संपूर्ण जगभरात या प्राणघातक विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आघाडीवर लढणाऱ्या सर्व लोकांची प्रशंसा करून आज माझे भाषण मी येथेच थांबवतो.

डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स, वैज्ञानिक, पत्रकार, वस्तू आणि सेवांचे वितरण करणारे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी मी येथे उभा आहे – हे सगळे आज ‘सुपर ह्युमन’ ची भूमिका बजावत आहेत. ते आमचे खरे नायक आहेत.

या परिषदेत बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे.

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624997) Visitor Counter : 292