संरक्षण मंत्रालय
समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा
भारतीय नागरिकांना घेऊन आयएनएस जलाश्व मालेतून रवाना
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2020 1:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2020
भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे परदेशातून परत आणण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात भारतीय नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाचे योगदान म्हणून भारतीय नौदलाच्या जलाश्व जहाजावर माले येथील बंदरात 15 मे 20, रोजी 588 भारतीय नागरिकांना चढविण्यात आले. या 588 प्रवाशांमध्ये सहा गर्भवती माता आणि 21 मुलांचा समावेश आहे.
माले येथे जोरदार पाऊस आणि ताशी 30 ते 40 नॉट्स वेगाने वाहणारे वारे या वातावरणात जहाजाच्या कर्मचार्यांनी सुरक्षितता आणि वैद्यकीय नियमांचे प्रत्येक वेळी पालन करीत प्रवाशांसाठी असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्याची खात्री दिली. प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या नियोजित गंतव्य प्रक्रियेस खराब वातावरणामुळे अडथळा निर्माण झाला.
(1)V2N9.jpeg)
आज सकाळी माले येथून कोचीसाठी हे जहाज सोडण्यात आले.
* * *
M.Jaitly/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1624342)
आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam