गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        विशाखापट्टणम गॅसगळती दुर्घटनेचा आढावा आणि कारवाईबाबत माहिती घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली NCMC ची बैठक
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                08 MAY 2020 7:45PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                
 
नवी दिल्ली, 8 मे 2020 
 
कॅबिनेट मंत्री राजीव गऊबा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विशाखापट्टणम इथल्या गॅसगळती दुर्घटनेचा आणि त्यानंतरच्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.  
आंध्रप्रदेशच्या मुख्य सचिवांनी यावेळी समितीला सद्यस्थितीची माहिती दिली  तसेच कालच्या दुर्घटनंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. या अपघातानंतर लोकांना घटनास्थळापासून दूर नेणे आणि गळती रोखण्याचे उपाय त्वरित केले गेले, असे त्यांनी सांगितले. या गॅसगळतीमुळे लोकांचे आरोग्य, तसेच जल आणि वायूप्रदूषण यासारख्या दूरगामी परिणामांवर देखील यावेळी चर्चा झाली.  
कॅबिनेट सचिवांनी सद्यस्थिती, तयारी तसेच बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला. राज्य सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल, असे त्यांनी सांगितले. रासायनिक प्रकल्पांची सुरक्षा आणि औद्योगिक प्रक्रिया याबाबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच वैद्यकीय तज्ञांशी देखील मेडिकल प्रोटोकॉल बाबत चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
विविध संबंधित विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.
*****
U.Ujgare/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
 
                
                
                
                
                
                (Release ID: 1622225)
                Visitor Counter : 168