गृह मंत्रालय

कोविड-19 मुळे भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांना भारतातून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाचे निर्बंध हटवल्याच्या तारखेपासून 30 दिवसांसाठी काही राजनैतिक सुविधांची अनुमती

Posted On: 05 MAY 2020 8:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे सध्या भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांना केंद्रीय गृह मंत्रालयाने 17-04-2020 रोजी अनुकंपा तत्वावर 3 मे 2020 पर्यंत काही राजनैतिक सुविधा देऊ केल्या होत्या. (https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1615496).

या संदर्भात विचार केला असता परदेशी नागरिक प्रादेशिक नोंदणी कार्यालय/ परदेशी नागरिक नोंदणी अधिकारी यांच्याकडून सध्या भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या खालील राजनैतिक सुविधा देण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परदेशी नागरिकांचा नियमित व्हिसा, ई-व्हिसा किंवा निर्धारित वास्तव्य या सुविधांचा कालावधी समाप्त झाला असेल किंवा 1-02-2020 पासून(मध्यरात्री) आजपर्यंतच्या काळात  समाप्त होत असेल, तर भारतातून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील निर्बंध उठवण्यात आल्या नंतरच्या सुविधांसाठी,  एक ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी दिलेली मुदत अनुकंपा तत्वावर वाढवण्यात आली आहे.

भारतातून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील निर्बंध हटवण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या कालावधीसाठी ही मुदतवाढ अतिरिक्त कालावधीसाठीच्या वास्तव्याबद्दलच्या दंडाविना लागू असेल. अशा परदेशी नागरिकांनी विनंती केल्यास त्याच आधारे त्यांना मायदेशी परतण्याची परवानगी दिली जाईल.

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1622080) Visitor Counter : 206