कृषी मंत्रालय

रब्बी हंगाम 2020-21 मध्ये डाळी, तेलबिया आणि गहू खरेदी जोरात सुरु


2,682 कोटी रुपयांच्या डाळी आणि तेलबिया खरेदीचा 3.25 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा

उन्हाळी पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

Posted On: 05 MAY 2020 6:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

रब्बी हंगाम 2020-21 मध्ये 2 मे 2020 पर्यंत 2,682 कोटी रुपये किंमतीच्या एमएसपी मुल्यानुसार 2,61,565 मेट्रिक टन डाळी आणि 3,17,473 मेट्रिक टन तेलबियांची खरेदी झाली असून 3,25,565 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. यापैकी, 14,859 मेट्रिक टन डाळी आणि 6706 मेट्रिक टन तेलबियांची खरेदी 1 आणि 2 मे रोजी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि हरयाणा या राज्यांमध्ये झाली.

त्याशिवाय, रब्बी पणन हंगाम 2020-21 मध्ये एफसीआयमध्ये 1,87,97,767 मेट्रिक टन गहू दाखल झाला, त्यापैकी 1,81,36,180 मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली.

दरम्यान, उन्हाळी पिकांचे पेरणी क्षेत्र खालीलप्रमाणे आहे:

तांदूळ: मागील वर्षीच्या उन्हाळी तांदळाच्या 25.26 लाख हेक्टर पेरणी क्षेत्राशी तुलना करता यावर्षी या क्षेत्रात वाढ होऊन ते अंदाजे 34.80 लाख हेक्टर झाले आहे. 

 

डाळी: गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 8.77 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची पेरणी केली असून गेल्यावर्षी याच हंगामात 5.44 लाख हेक्टरवर डाळींची पेरणी करण्यात आली होती.

तृणधान्ये: मागील वर्षीच्या तृणधान्यांच्या 5.49 लाख हेक्टर पेरणी क्षेत्राशी तुलना करता यावर्षी या क्षेत्रात वाढ होऊन ते अंदाजे 9.12 लाख हेक्टर झाले आहे. 

तेलबिया: यावर्षी सुमारे 8.87 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून गेल्यावर्षी याच हंगामात 7.00 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी केली होती.

कोविड-19 साथीच्या आजारामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन कालवधीत शेतकरी आणि शेतीच्या कामांना सुविधा पुरविण्यासाठी भारत सरकारचा, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग अनेक उपाययोजना राबवीत आहे. 24 मार्च 2020 पासून सुरु झालेल्या लॉकडाऊन कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत सुमारे 9.06 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला असून आतापर्यंत 18,134 कोटी रुपये वितरीत केले आहेत.

*****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622078) Visitor Counter : 127