पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रशियाचे ऊर्जामंत्री अलेक्झांडर नोवाक यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
Posted On:
07 MAY 2020 1:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2020
पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रशियाचे ऊर्जामंत्री अलेक्झांडर नोवाक यांच्यात 6 मे 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेत जागतिक तेल आणि वायू परिदृश्य तसेच तेल व वायू आणि कोकिंग कोळसा अर्थात धातुकर्मीय कोळसा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यात आला.
नोवाक यांनी यावेळी भारतीय मंत्र्यांना नुकत्याच स्वाक्षरी केलेल्या OPEC+ कराराची माहिती दिली. प्रधान यांनी या कराराराचे जागतिक ऊर्जा बाजारपेठेला स्थिरता आणि पूर्वानुमान प्रदान करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून स्वागत केले आणि एक उपभोक्ता देश म्हणून भारतासाठी हे खूपच महत्वाचे आहे. एक प्रमुख भागीदार म्हणून भारताच्या भूमिकेचे आणि हायड्रोकार्बन वापराचा मागणी करणारा एक प्रमुख देश म्हणून रशियाने भारताला स्वीकृती दिली तसेच त्याचे कौतुक केले. भारतीय अर्थव्यवस्था ही हायड्रोकार्बनसाठी नेहमीच मागणी केंद्र राहील यावर प्रधान यांनी यावेळी जोर दिला.
उभय मंत्र्यांनी दोन्ही देशांदरम्यान चालू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला, ज्यात व्हॉस्टॉक प्रकल्पातील रोझनफ्टचा सहभाग, एलएनजीचा नोव्हेटेक पुरवठा, गेल आणि गॅझप्रॉममधील सहकार्य, गॅझप्रोम्नफ्ट सह संयुक्त प्रकल्प, रोसनेफ्टकडून इंडियन ऑईलला कच्च्या तेलाचा पुरवठा इत्यादींचा समावेश होता. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आकस्मिक परिस्थितीतही भारताच्या निरंतर सहकार्याचे रशियाने कौतुक केले. भारतीय ऊर्जा गरजांना पाठिंबा देण्याच्या रशियाच्या संकल्पाचा नोवाक यांनी पुनरुच्चार केला.
या बैठकीत कोकिंग कोळसा क्षेत्रातील सहकार्यावर विशेष जोर देण्यात आला, ज्यात सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय पंतप्रधानांच्या रशिया दौऱ्यानंतर लक्षणीय प्रगती झाली आहे. या संदर्भात, सामंजस्य करार संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने कोकिंग कोळसा क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी उच्चस्तरीय डब्ल्यूजी बैठक आयोजित करण्याच्या प्रधान यांच्या सूचनेचे रशियाच्या मंत्र्यांनी स्वागत केले.
भारताने पक्षाने रशियन बाजूने सुरु असलेल्या दीर्घकालीन सहकार्याचे स्वागत केले आणि परिस्थिती स्थिर झाल्यांनतर मंत्री नोवाक यांनी सोयीस्कर वेळ पाहून भारत दौर्यावर येण्याच्या आपल्या विनंतीचा पुनरुच्चार केला. दरम्यानच्या काळात उभय मंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यामतून चर्चा करण्याचे निर्देश दिले.
जागतिक ऊर्जा परिस्थिती आणि सध्याच्या आव्हानांच्या मूल्यांकनावर आणि मागणीच्या पुनरुत्थानाच्या चालकाच्या रूपात भारत महत्वाची भूमिका निभावेल जी जागतिक आर्थिक पुनरुज्जीवनात महत्त्वपूर्ण ठरेल यावर उभय पक्षांनी सहमती दर्शविली.
* * *
M.Jaitly/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621752)
Visitor Counter : 153
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam