रसायन आणि खते मंत्रालय

वैद्यकीय उपकरणांची खरेदी प्राधान्याने


मेक इन इंडिया वर भर

2.5 कोटी आवश्यकतेची पूर्तता करताना केंद्र/राज्य सरकारी संस्था आणि औषध विक्रेत्यांना सुमारे 16 कोटी एचसीक्यू गोळ्या वितरीत केल्या

Posted On: 01 MAY 2020 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2020

 

1. एमएचएच्या दिनांक 29 मार्च 2020 च्या आदेशानुसार, औषध निर्मिती विभाग सचिव डॉ. पी.डी. वाघेला, आणि डीपीआयआयटी सचिव, वस्त्रोद्योग सचिव, सीबीआयसी अध्यक्ष, डीआरडीओ सचिव, पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य संशोधन विभाग इत्यादीच्या संयोजकत्वा अंतर्गत सशक्त गट -3 तयार केला होता. पीपीई, मास्क, हातमोजे आणि व्हेंटिलेटर - उत्पादन, खरेदी, आयात आणि वितरण यासारख्या आवश्यक वैद्यकीय उपकरणांची उपलब्ध सुनिश्चित करणे हे या गटाचे मुख्य कार्य आहे.

2. हा गट नियमितपणे बैठका घेत असून आतापर्यंत 24 बैठका झाल्या आहेत. ईजीने विविध उपकरणांच्या निर्मितीच्या प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी तांत्रिक समिती गठीत केली होती. जून 2020 पर्यंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व आरोग्य संशोधन विभागाने दिलेल्या माहितीनुसार विविध वैद्यकीय उपकरणांच्या आवश्यकतेच्या आधारे, ही समिती सध्या कार्यरत असलेल्या उत्पादकांची क्षमता वृद्धिंगत करण्याकडे तसेच विविध वैद्यकीय उपकरणांचे नवीन उत्पादक शोधण्यावर लक्ष देत आहे.  देशांतर्गत उत्पादकांना कच्चा माल, सुटे भाग, प्रवास आणि लॉजिस्टिक या संदर्भात भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडवून त्यांना सुविधा पुरविली जात आहे. सध्याच्या साथीच्या आजाराच्या  काळात वैद्यकीय पुरवठ्यासंबंधी जागतिक स्तरावरील मागणी, देशांतर्गत क्षमतांचा अभाव आणि बहुतेक आवश्यक वैद्यकीय पुरवठा मोठ्या प्रमाणात आयात करणे ही मोठी आव्हाने होती. सरकार देशांतर्गत उत्पादनाला चालना देत आहे आणि काही महत्वाच्या वस्तूंच्या खरेदीची मुदत पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यासच आयातीचा अवलंब केला जात आहे. या राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी, वैज्ञानिक आणि अभियंते याचा गट एकत्रीत चोवीसतास कार्यरत आहे.


व्हेंटिलेटर

मेसर्स एच अँड एफडब्ल्यूने जून 2020 पर्यंत 75,000 व्हेंटिलेटरची अंदाजित मागणी दर्शविली आहे. सध्या 19,398 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ईजीच्या सुचनेनुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची केंद्रीय खरेदी एजन्सी म्हणून कार्यरत असणाऱ्या मेसर्स एचएलएल लाईफकेअर मर्यादित ने 60,884 व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली आहे. ऑर्डर दिलेल्या एकूण व्हेंटिलेटरपैकी 59,884 व्हेंटिलेटरची ऑर्डर देशांतर्गत उत्पादकांना देण्यात आली असून 1000 व्हेंटिलेटर आयात करण्यात आले आहेत. प्रस्तावित मागणी आणि आदेशांमध्ये राज्य सरकारांच्या आवश्यकतांचा समावेश आहे.

मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून, व्हेंटिलेटरच्या   

स्थानिक उत्पादकांची निवड करून त्यांना वैशिष्ट्ये, प्रशिक्षण आणि इतर शिष्टाचारांना अंतिम रूप देणे, नवीन पुरवठा साखळी तयार करणे, पुरवठादार आणि राज्य सरकार यांच्यात लॉजिस्टिक संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे आणि उपभोग्य वस्तूंच्या व्यवस्थेबद्दल निर्णय घेणे इत्यादीबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख देशांतर्गत उत्पादकांमध्ये मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (स्कॅनरे यांच्या सहकार्याने) यांचा समावेश आहे ज्यांना 30,000 व्हेंटिलेटरची ऑर्डर देण्यात आली आहे. मेसर्स अ‍ॅगवा (मेसर्स मारुती सुझुकी लिमिटेडच्या सहकार्याने) ज्यांना 10000 व्हेंटिलेटरची ऑर्डर देण्यात आली आहे आणि एएमटीझेड (एपी मेडटेक झोन) ज्यांना 13,500 व्हेंटिलेटरसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. बहुतेक सर्व देशांतर्गत उत्पादकांनी ठरलेल्या कालावधीत वितरण करण्यास सुरवात केली असून सध्या ते पाठवणी पूर्व तपासणीच्या टप्प्यावर आहेत.  

II ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर

ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरसंदर्भात देश स्वयंपूर्ण आहे. ऑक्सिजनची एकूण उत्पादन क्षमता 6,400 मे.टन आहे, त्यापैकी सुमारे 1000 मे.टन वैद्यकीय ऑक्सिजनसाठी वापरली जाते. ऑक्सिजनचे 5 मोठे आणि 600 लहान उत्पादक आहेत. सुमारे 409 रुग्णालयांची स्वतःची ऑक्सिजन निर्मिती केंद्र आहेत  आणि देशात सुमारे 1050 क्रायोजेनिक टँकर आहेत. 

पुरवठा करण्यासाठी सुमारे 4.38 लाख वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, 1.03 लाख नवीन वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडर्ससाठी ऑर्डर देण्यात आली आहे. आवश्यक असल्यास, पाच लाख औद्योगिक ऑक्सिजन सिलेंडर देखील रूपांतरणासाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, 60,000 सिलेंडर बदलण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले गेले आहेत.

III वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीईएस) 

जून 2020 पर्यंत पीपीई किट्सची एकूण अंदाजित मागणी 2.01 कोटी रुपयांची आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी 2.22 कोटी रुपयांची ऑर्डर याआधीच देण्यात आली असून त्यातील 1.42 कोटींची ऑर्डर ही देशांतर्गत उत्पादकांना देण्यात आली आहे. 80 लाख पीपीई आयात केले जात आहेत. यापूर्वी देशात पीपीईचे कोणतेही देशांतर्गत उत्पादन झाले नाही. जवळपास सर्वच पीपीई आयात केले आहेत. अल्पावधीतच, 107 उत्पादकांना निवडून त्यांना सुविधा प्रदान करण्यात आल्या आणि त्यांनी आपले दैनंदिन उत्पादन 1.87 लाख केले आहे (30 एप्रिल 2020 पर्यंत). आतापर्यंत सुमारे 17.37 लाख पीपीई प्राप्त झाले आहेत. पुढील दोन महिन्यांत अतिरिक्त देशांतर्गत पुरवठा 1.15 कोटींपेक्षा जास्त होईल.

नवीन तंत्रज्ञान, साहित्य आणि चाचणी सुविधा विकसित करण्यात सरकारी संस्था आघाडीवर आहेत. सध्या अस्तित्त्वात असलेल्या सिट्रा (दक्षिण भारत वस्त्रोद्योग संशोधन संघ), कोयंबतुर; या चाचणी प्रयोगशाळेच्या व्यतिरिक्त, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि आयुध कारखाना मंडळाने देशातील विविध ठिकाणी 9 नवीन प्रयोगशाळा कार्यरत केल्या आहेत. स्थानिक उत्पादकांना पुरवठा करण्यासाठी डीआरडीओने नवीन पीयू लेपित नायलॉन / पॉलिस्टर देखील विकसित केले आहेत.

IV एन-95 मास्क 

जून 2020 पर्यंत एन-95 मास्कची एकूण अंदाजित मागणी 2.72 कोटी रुपये इतकी आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी 2.49 कोटी रुपयांची ऑर्डर याआधीच देण्यात आली असून त्यातील 1.49 कोटींची ऑर्डर ही देशांतर्गत उत्पादकांना देण्यात आली असूनही जवळपास 1 कोटी मास्क आयात केले जात आहेत. देशात चार प्रमुख देशांतर्गत उत्पादक आहेत आणि बरेच अजून रांगेत आहेत, ज्यांची निवड करण्यात आली आहे. दररोज देशांतर्गत उत्पादन सुमारे 2.30 लाख आहे (30 एप्रिल 2020 पर्यंत). आतापर्यंत सुमारे 49.12 लाख एन 95 मास्क प्राप्त झाले आहेत. पुढील दोन महिन्यांत अतिरिक्त देशांतर्गत पुरवठा 1.40 कोटींपेक्षा जास्त होईल. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (क्यूसीआय) च्या माध्यमातून सध्या अस्तित्त्वात असलेल्या सिट्रा प्रयोगशाळेच्या व्यतिरिक्त अधिक प्रयोगशाळेची भर पडत आहे.

V निदान संच 

आयसीएमआरने दररोज सुमारे 70,000 चाचणी करण्याचा टप्पा पातळी गाठला असून आत्तापर्यंत 9 लाखांहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत. गरजांवर आधारित लक्ष केंद्रित साधन म्हणून चाचणी करण्याचे धोरण आहे. चाचणीची खात्री करण्यासाठी, किट, उपकरणे, अभिकर्मक इत्यादींची उपलब्धता महत्वपूर्ण आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना चाचणी संच आदि बाबतीत मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली असून राज्य हे संच खरेदी करण्यासही मोकळे आहेत आणि काही राज्य सरकार त्यांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी त्यांची खरेदी देखील करत आहेत.

डीएचआरने 35 लाख मॅन्युअल आरटी-पीसीआर संचाच्या आवश्यकतेचे मूल्यांकन केले असून त्यासाठी प्रोब, प्राइमर आणि मास्टरमिक्सला ऑर्डर देण्यात आली आहे. आजपर्यंत सुमारे 16.4 लाख चाचण्यांसाठी साहित्य प्राप्त झाले आहे. 35 लाख संयुक्त आरटी-पीसीआर संचांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 19 लाख संच मागविण्यात आले असून त्यापैकी 2 लाख संचांची ऑर्डर देशांतर्गत उत्पादकांना देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण 13.75 लाख संयुक्त आरटी-पीसीआर संच  प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त डीएचआरने 2 लाख रोचेस कोबास चाचणी संचांची ऑर्डर दिली आहे, त्यातील 60,000 संच प्राप्त झाले आहेत. 

VI औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणे 

औषधे आणि वैद्यकीय उपकरणाच्या उत्पादनावर आणि वितरणावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी, औषधनिर्मिती विभाग (डीओपी) आणि राष्ट्रीय औषध निर्मिती किंमत प्राधिकरण (एनपीपीए) येथे दोन नियंत्रण कक्ष सुरु केले आहेत. सरकार उत्पादक, वितरक आणि औषध निर्मात्यांसोबत  सतत संवाद साधत आहे. राज्य सरकारे या उद्योगावर देखरेख ठेवत आहेत आणि सुविधा पुरवत आहेत. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) उत्पादन दरमहा 12.23 कोटींवरून 30 कोटींवर गेले आहे. 2.5 कोटी आवश्यकतेची पूर्तता करताना  केंद्र/राज्य सरकारी संस्था आणि औषध विक्रेत्यांना सुमारे 16 कोटी एचसीक्यू गोळ्या वितरीत केल्या 

VII इतर मंत्रालये/विभागांची भूमिका 

वस्त्रोद्योग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, डीपीआयआयटी, परराष्ट्र व्यवहार, डीआरडीओ आणि आयसीएमआर मंत्रालय ईजी -3 चा भाग आहेत आणि त्यांनी या कार्यात मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे. याव्यतिरिक्त, एमईएने भारतीय उत्पादकांना आवश्यक वैद्यकीय पुरवठा आणि सुटे भागांच्या आयातीद्वारे खरेदी करण्यात मदत केली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने मालवाहू-एअर ब्रिज आणि लाइफलाइन उडान प्रकल्पांद्वारे आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर औषधे आणि वैद्यकीय उपकरणे व त्यांचे सुटे भाग इत्यादींची वाहतूक हालचाल करण्यास मदत केली आहे. बंदरे, सीमाशुल्क, रेल्वे आणि टपाल विभागाच्या इतर प्राधिकरणांनी वैद्यकीय उपकरणांचा वेगवान पुरवठा आणि वितरण सुनिश्चित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. राज्य सरकारही या प्रयत्नांमध्ये सक्रीय योगदान देत आहेत.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1620217) Visitor Counter : 308