इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
कॉमन सर्विस सेंटर मार्फत (CSCs )आधार अद्ययावतीकरणाची परवानगी
20,000 सीएससी नागरिकांना ही सेवा पुरवणार
Posted On:
28 APR 2020 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2020
ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या सोयीसाठी आधार म्हणजे UIDAI ने कॉमन सर्विस सेंटर्स (CSCs) उघडली आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अंतर्गत CSC या एका SPVला आधार अद्ययावत करण्यासाठी बँकिंग करस्पाँडंट म्हणून 20,000 कॉमन सर्विस सेंटर्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान आणि दूरसंचार तसेच कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका ट्विटद्वारे हे स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या ट्विटनुसार नागरिकांना आधार अद्ययावत करण्याची सुविधा आता 20,000 कॉमन सर्विस सेंटर्स मधून मिळेल. CSCs आपलं आधार संबंधित कार्य जबाबदारीने पार पाडेल आणि UIDAI ने यासंदर्भात दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करेल असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आधार संबंधित सेवा त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळ उपलब्ध होतील, असंही त्यांनी नमूद केले आहे.
बँकिंग सेवांशी जोडलेल्या कॉमन सर्विस सेंटर्सनी आपल्या पायाभूत सुविधा कार्यरत करून आवश्यक त्या मंजुऱ्या घेण्यासाठी UIDAI ने जूनपर्यंतची मुदत दिली आहे. CSC, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश त्यागी यांनी सर्व बँकिंग करस्पाँडंटसना तांत्रिक आणि इतर अद्ययावतीकरणासंबंधीचे काम तात्काळ पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच UIDAI ने सुचवलेले सर्व अद्ययावतीकरण करून ही केंद्रे लवकरच आधार अद्ययावतीकरणाच्या कामाला सुरुवात करतील असे म्हटले आहे.
आधार अद्ययावतीकरणाचे काम CSC मार्फत पुन्हा चालू केल्याबद्दल त्यागी यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील डिजिटल भारत प्रत्यक्षात येण्यासाठीच्या प्रयत्नांना यामुळे गती येईल असे म्हटले आहे.
कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी घातलेल्या लॉकडाऊन निर्बंधातही CSC मधून आधार अद्ययावतीकरण होणे हा मोठा दिलासा आहे. नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना या 20000 अतिरिक्त केंद्रांमुळे आधार अद्ययावत करण्यासाठी बँक किंवा टपाल कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
* * *
G.Chippalkatti/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618986)
Visitor Counter : 269
Read this release in:
Assamese
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam