शिक्षण मंत्रालय

एक महत्वपूर्ण संशोधन यशस्वी करत आयआयटी दिल्लीने विकसित केले अल्पखर्चिक तपासणी-मुक्त कोविड-19 रुग्ण ओळखणारे उपकरण


कोविड-19चा संसर्ग ओळखणाऱ्या उपकरणाच्या क्रांतीकारक संशोधनाबादल आयआयटीच्या चमूचा मनुष्यबळ विकास मंत्र्यांकडून सत्कार

ICMR ने मान्यता दिलेल्या या नव्या चाचणी कीटमुळे आरोग्य सेवांना मदत होऊन कोविड च्या लढ्यात मोठे योगदान मिळेल- मनुष्यबळ विकासमंत्री

Posted On: 24 APR 2020 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या रुग्णांची तपसणी न करता, त्याच क्षणी PCR चाचणीद्वारे निदान करणारे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधक शास्त्रज्ञांनी विकसित केले असून, आज या सर्व चमूचा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना पोखरियाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि संशोधकांना कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी औषधे आणि इतर गोष्टींवर संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षणसंस्था या दिशेने युद्धपातळीवर काम करत आहेत. या लढ्यात, जगावर अवलंबून न राहता, आपण आपली ताकद वाढवावी, अशी पंतप्रधानांची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन, आयआयटी सारख्या संस्थांनी या आजारावर संशोधन करण्यास सुरुवात केली, असे पोखरियाल यांनी सांगितले. या संस्थांनी केलेल्या या संशोधनाबद्दल या चमूचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.

अत्यंत माफक खर्चात तयार करण्यात आलेली ही किट भारताच्या जनतेसाठी अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कीटमुळे केवळ आरोग्य सेवा सक्षम होणार नाहीत, तर या संकटकाळी सरकारलाही मोठी मदत मिळेल, असे ते म्हणाले. हे उपकरण विकसित केल्याबद्दल, त्यांनी आयआयटी दिल्लीतील कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्स च्या संशोधकांचे अभिनंदन केले. या उपकरणाला आयसीएमआर ने देखील मान्यता दिली आहे.  PCR-आधारित निदान उपकरण कीट विकसित करुन या संशोधनासाठी ICMR ची मान्यता मिळवणारे आयआयटी दिल्ली ही देशातील पहिली शिक्षणसंस्था ठरली आहे.

या संशोधनासाठी मंत्रालयाकडून सर्व प्रकारचे सहाय्य मिळेल, असे आश्वासन पोखरीयाल यांनी दिले. असे संशोधन मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत उचललेले महत्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले. या संशोधनाला ICMR ची मान्यता मिळवून देण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पोखरियाल यांनी त्यांचे आभार मानले.

कोविड-19 च्या संसर्गाची चाचणी करणारे हे पहिले तपासणीमुक्त उपकरण ठरले असून, हे विशिष्ट आणि स्वस्त दरात चाचण्या करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी माहिती रामगोपाल राव यांनी दिली.  ह्या उपकरणाद्वारे चाचणी करण्यासाठी फ्लोरोसंट तपासणीची गरज नसल्यामुळे त्याची संख्या सहज वाढवता येईल. एखाद्या उद्योग समूहाच्या मदतीने या तपासणी किट्स तयार करुन त्या लवकरात लवकर माफक दारात उपब्ध करुन देण्याचा या चमूचा प्रयत्न आहे.  

या कार्यक्रमाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1618028) Visitor Counter : 206