नागरी उड्डाण मंत्रालय

कोविड-19 आपत्तीच्या काळात हवाई वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिक आणि संबंधितांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची हरदीप सिंग पुरी यांच्याकडून प्रशंसा


कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात लाईफलाईन उडान सेवेच्या माध्यमातून 3,43,635 किमीपेक्षा जास्त अंतर कापून 591 टन मालाची वाहतूक

Posted On: 24 APR 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी कोविड-19च्या काळात हवाई वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिक आणि संबंधितांनी लाईफलाईन उडानअंतर्गत, जीवरक्षक औषधे आणि अत्यावश्यक सामग्रीचा देशभरातील नागरिकांना पुरवठा करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची प्रशंसा. आतापर्यंत लाईफलाईन उडानअंतर्गत सुमारे 3,43,635 किमी अंतर कापण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्वीट वरून दिली आहे. या योजनेंतर्गत एयर इंडिया, अलायन्स एयर, आयएएफ आणि खाजगी कंपन्यांनी 347 उड्डाणे केली.  यापैकी एयर इंडिया आणि अलायन्स एयरने 206 उड्डाणांचे परिचालन केले. आतापर्यंत 591.66 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. 19 ते 23 एप्रिल 2020 दरम्यान व्हिस्टाराने सात मालवाहतूक उड्डाणे करून 8998 किमी अंतर कापून 20 टन मालाची वाहतूक केली. स्पाईसजेटने 24 मार्च ते 23 एप्रिल दरम्यान 7,94,846 किमी अंतर कापून 522 मालवाहतूक उड्डाणांच्या माध्यमातून 3993 टन मालाची वाहतूक केली.  यामध्ये 178 आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उड्डाणांचा समावेश होता. ब्लू डार्टने 25 मार्च ते 23 एप्रिल दरम्यान 184 मालवाहतूक उड्डाणांचे परिचालन करून सुमारे 1,87,155 किमी अंतर कापून 2957 टन मालाची वाहतूक केली. यामध्ये सहा आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उड्डाणांचा समावेश होता. 3 ते 23 एप्रिल 2020 या काळात इंडिगोने 37 मालवाहतूक उड्डाणे परिचालित केली आणि 48,344 किमी अंतर कापून 101 टन माल वाहून नेला. त्यात आठ आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती.

यामध्ये सरकारसाठी वैद्यकीय सामग्रीच्या मोफत वाहतुकीचा समावेश होता. स्थानिक मालवाहतूकदार व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक उड्डाणे करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एयर इंडियाने 23 एप्रिल 2020 रोजी हाँगकाँग आणि ग्वांगझू येथून 61 टन वैद्यकीय सामग्री भारतात आणली. त्याचबरोबर ब्लू डार्टने 14 एप्रिल ते 23 एप्रिल 2020 या काळात ग्वांगझूहून 86 टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक केली.

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1617944) Visitor Counter : 140