प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

कोविड-19 विशेष ड्रोन्सचा वापर करून वाराणसीत निर्जंतुकीकरण

Posted On: 23 APR 2020 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  एप्रिल 2020

वाराणसीमध्ये कोविड -19 निर्जंतुकीकरणाला सहाय्य करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या ड्रोन्सचा वापर सुलभतेसाठी इन्व्हेस्ट इंडिया या देशातील  राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेने अग्नी  मिशन आणि इन्व्हेस्ट इंडियाच्या बिझनेस इम्यूनिटी प्लॅटफॉर्म (बीआयपी) च्या माध्यमातून सहकार्य केले आहे.

सरकारचे कोविड -19 धोरण जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी अनुकूल असून कमीतकमी लोकांना याचा संसर्ग होईल याकडे लक्ष देऊन कोविड -19 पासून भारतीयांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आहे. हे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासन क्षमता वाढवण्यासाठी, सरकार तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करत आहे यावर ड्रोन  हे उत्तर आहे. ड्रोनचा वापर करून, अधिकारी मोठ्या, गर्दी असलेल्या आणि संवेदनशील शहरी भागात किटाणुनाशक फवारणी करु शकतात. यामुळे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मानवी संपर्क कमी करतानाच कोविड-19 पासून शहरातील नागरिकांचे  रक्षण करता येईल.

चेन्नईतील गरुड एरोस्पेस या ड्रोन स्टार्टअपला मदत करून निर्जंतुकीकरणाबाबत वाराणसीच्या इच्छेला प्रतिसाद देत या पथकाने केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकार्यांबरोबर काम केले जेणेकरून गरुडचे तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांना वाराणसीत पोहचवता येईल. या पथकाने यासाठी प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करून देखरेख ठेवली आणि  कोविड-19 चा  एकत्र सामना करण्यासाठी सरकार आणि नाविन्यपूर्ण संशोधकांना सहकार्य केले.वाराणसीत ड्रोनचा वापर नुकताच सुरू झाला आहे. हे पथक आता संपूर्ण भारतातील जास्तीत जास्त शहरांमध्ये अशाच प्रकारच्या क्षमतांचा विस्तार करेल.

कोविड-19 विरुद्ध भारतीय अधिकाऱ्यांच्या लढाईला बळकटी देण्यासाठी सरकार-संशोधक सहकार्यातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1617740) Visitor Counter : 211