संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कोविड-19 नमुन्यांची चाचणी घेण्यासाठी डीआरडीओ विकसित प्रयोगशाळेचे उद्घाटन

Posted On: 23 APR 2020 6:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 एप्रिल 2020

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ईएसआयसी रुग्णालय, हैद्राबाद आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओ ने विकसित केलेल्या मोबाईल जीवरेणूशास्त्र संशोधन आणि तपासणी प्रयोगशाळेचे (एमव्हीआरडीएल) (मोबाईल वाय्रोलॉजि रिसर्च एंड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले.

याप्रसंगी संरक्षण मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने वेळोवेळी योग्य निर्णय घेतल्याने इतर बहुतांश देशांसोबत तुलना केली असता भारतातील कोविड-19 चा प्रसार तुलनात्मक दृष्ट्या खूप कमी आहे.

राजनाथ सिंह यांनी, 6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असलेल्या जैव-सुरक्षा श्रेणी-2 आणि श्रेणी-3 प्रयोगशाळांची स्थापना 15 दिवसांच्या विक्रमी कालवधीत केल्याबद्दल सगळ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, या चाचणी सुविधेत दिवसाला 1000 हून अधिक नमुन्यांची चाचणी होऊ शकते ज्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढाईतील देशाची क्षमता अधिक वृद्धिंगत होईल.

ते म्हणाले की, कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आपले सशस्त्र दल विलगीकरण कक्ष उभारणे, आरोग्यसेवा पुरविणे, भारतीय नागरिकांना इतर देशांमधून मायदेशी घेऊन येणे इत्यादी अनेक कामांच्या माध्यमातून आपले योगदान देत आहेत आणि हे प्रयत्न असेच सुरु राहतील. 

या कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार, माहिती तंत्रज्ञान उद्योग मंत्री तसेच तेलंगणा सरकारचे  नगरपालिका प्रशासन व नगरविकास मंत्री के.टी. रामराव, तेलंगणा राज्याचे कामगार मंत्री, चे. मल्ला रेड्डी आणि डीडीआर आणि डी सचिव  डॉ. जी. सतीश रेड्डी सचिव आणि डीआरडीओ अध्यक्ष उपस्थित होते.

कोविड-19 ची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन आणि विकास कामांना गती देणारी अशाप्रकारची पहिलीच मोबाईल व्हायरल संशोधन प्रयोगशाळा (एमव्हीआरएल) ही ईएसआयसी रुग्णालय, हैद्राबाद यांच्याशी सल्लामसलत करून डीआरडीओ च्या हैद्राबाद येथील संशोधन केंद्र इमारत (आरसीआय) येथे विकसित करण्यात आली.

मोबाईल व्हायरल संशोधन प्रयोगशाळा ही बीएसएल 3 प्रयोगशाळा आणि बीएसएल 2 प्रयोगशाळेचे संयोजन आहे जे उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यासाठी डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआर जैव सुरक्षा मानदंडांनुसार प्रयोगशाळा तयार केली आहे. या प्रणालीमध्ये विद्युत नियंत्रणे, लॅन, टेलिफोन केबलिंग आणि सीसीटीव्ही समाविष्ट आहेत.

ही मोबाईल प्रयोगशाळा कोविड-19 च्या निदानासाठी आणि औषध चाचणीसाठी जीवाणू वृद्धी, कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा साधित उपचार, कोविड-19 रूग्णांची व्यापक रोगप्रतिकारक शक्ती तपासणे, या लसीच्या विकासासाठी भारतीयांसाठी विशिष्ट क्लिनिकल चाचणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रयोगशाळेत दररोज 1000-2000 नमुन्यांची तपसणी केली जाते. ही प्रयोगशाळा आवश्यकतेनुसार देशात कुठेही घेऊन जाऊ शकतो.

डीआरडीओने कंटेनरच्या तरतुदीसाठी मेसर्स आयकॉमचे, निर्धारित कालावधीत बीएसएल 2 आणि बीएसएल 3 प्रयोगशाळा तयार करण्यासाठी डिझाइन तयार करणे आणि उभारणीसाठी मेसर्स आयक्लिन आणि बेस फ्रेम प्रदान करण्यासाठी मेसर्स हाय टेक हायड्रॉलिक्सच्या योगदानाचे आभार मानले .

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1617542) Visitor Counter : 233