गृह मंत्रालय
शहरी भागामध्ये काही गोष्टींसाठी लॉकडाउन शिथील; ज्येष्ठ नागरिकांची घरामध्ये देखभाल करणे, प्रीपेड मोबाइल रिचार्ज, लोकोपयोगी सेवा, अन्नप्रक्रिया उद्योगांना सवलत
प्रविष्टि तिथि:
21 APR 2020 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2020
कोविड-19 महामारीबरोबर लढा देताना देशभरामध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र आता काही निवडक सेवा आणि काही लोकोपयोगी उद्योगांना या बंदीतून वगळण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. यासंबंधी नवीन मार्गदर्शक नियम जारी करण्यात आले आहेत.
(https://www.mha.gov.in/sites/default/files/MHA%20order%20dt%2015.04.2020%2C%20with%20Revised%20Consolidated%20Guidelines_compressed%20%283%29.pdf)
या संदर्भामध्ये जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाउनमध्ये शिथिलता दिलेल्या प्रवर्गातल्या विशिष्ट सेवा आणि उद्योगांच्या सवलतींविषयी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्या सर्व प्रश्नांच्या संदर्भात स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे -
- सामाजिक क्षेत्राअंतर्गत नियम 8 (एक) अनुसार घरामध्ये झोपून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची सातत्याने देखभाल करणारे कर्मचारी
- सार्वजनिक सुविधांमध्ये नियम 11 (पाच) अनुसार प्रीपेड मोबाईल रिचार्जची सेवा देणारे.
- जीवनावश्यक वस्तू पुरवठा संबंधीचे नियम 13 (एक) अनुसार शहरी भागातल्या अन्न प्रक्रिया उद्योगांना लॉकडाउनमधून वगळण्यात आले आहे. यामध्ये ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, पिठाच्या गिरण्या, डाळ तयार करणा-या गिरण्या अशा खाद्यप्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे.
लॉकडाउनमधून या उद्योगांना मुक्त केले असले तरीही कामाच्या ठिकाणी सर्वांनीच शारीरिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छता, हात धुणे बंधनकारक आहे.
या संदर्भात सर्व राज्यांनी जिल्हा पातळीवर निर्देश द्यावेत. कोणत्याही प्रकारे शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होवू नये आणि कोणाच्याही माध्यमातून स्थानिक पातळीवर कोविड-19 चा प्रसार होईल, अशी कृती होवू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत.
गृह मंत्रालयाने राज्यांना दिलेल्या आदेशाचा तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करावे.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1616991)
आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada