पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा आणि सरदार पटेल यांना वाहिली श्रद्धांजली

Posted On: 21 APR 2020 10:42AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरी सेवा दिनानिमित्त नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुभेच्छा दिल्या तसेच सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.

"आज नागरी सेवा दिनानिमित्त मी, सर्व नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. भारताने कोविड-19 वर यशस्वीरीत्या मात करावी यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी आणि प्रत्येकजण निरोगी राहील हे सुनिश्चित करण्यासाठी ते 24 तास काम करत आहेत.

नागरी सेवा दिनानिमित्त महान सरदार पटेल यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी आपला प्रशासकीय आराखडा तयार केला आणि विकासाभिमुख आणि दयाळू व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला",असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1616625) Visitor Counter : 144