रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संकेतस्थळावर उपलब्ध केली ढाबे, ट्रक दुरुस्ती दुकानांची यादी
Posted On:
20 APR 2020 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्ये, तेल विपणन कंपन्या अशा विविध संघटनांकडून प्राप्त झालेली देशभरातील उपलब्ध ढाबे आणि ट्रक दुरुस्ती दुकानांची यादी आणि तपशील आपल्या संकेतस्थळावर डॅशबोर्ड लिंक रुपात तयार केला आहे. Https://morth.nic.in/dhabas-truck-repair-shops-opened-during-covid-19 वर ही यादी पाहता येईल. कोविड -19महामारी प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये आवश्यक वस्तू देशाच्या निरनिराळ्या ठिकाणी पोहचविताना ट्रक चालक/ मालवाहतूकदार आणि सफाई कामगारांना प्रवास करणे सुलभ व्हावे म्हणून ही सुविधा तयार करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्ड दुव्यावर अद्ययावत केलेली माहिती पुरवण्यासाठी विविध हितसंबंधितांशी विशेषत: राज्ये / केंद्रशासित प्रदेश, तेल विपणन कंपन्या (ओएमसी) इत्यादींशी नियमित संपर्क ठेवला जातो.
ट्रक चालक आणि क्लिनरला राष्ट्रीय महामार्गालगतच्या ढाब्यांची आणि ट्रक दुरुस्ती दुकानांची माहिती मिळविण्यासाठी आणि संपर्क करण्यासाठी एनएचएआयचा मध्यवर्ती संपर्क क्रमांक 1033 उपयुक्त आहे.
हे ढाबे आणि दुरुस्तीची दुकाने, ड्रायव्हर्स, क्लीनर किंवा मालवाहतूक साखळीतील इतर कोणत्याही व्यक्तीने समाजात वावरताना शारीरिक अंतराच्या, मास्क वापरण्याच्या तसेच स्वच्छतेच्या आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
U.Ujgare/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1616446)
Visitor Counter : 332
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada