नागरी उड्डाण मंत्रालय

देशभरात आवश्यक वैद्यकीय सामान वितरीत करण्यासाठी लाईफलाईन उडाणच्या विमानांचा सुमारे 3 लाख किमी हवाई प्रवास

Posted On: 20 APR 2020 6:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020

 

लाईफलाईन उडाणच्या विमानांनी सुमारे 507.85 टन आवश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक करण्यासाठी सुमारे 3 लाख किलोमीटर हवाई प्रवास केला आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खाजगी विमान वाहतूक कंपन्यांद्वारे लाइफलाईन उडाण अंतर्गत 301 उड्डाणे केली आहेत. कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठबळ देण्यासाठी देशभरातील दुर्गम भागात आवश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक करण्यासाठी नागरी एमओसीए ‘लाईफलाईन उडाण’ विमानांचे उड्डाण करीत आहे.

पवन हंस लि. सह हेलिकॉप्टर सेवा जम्मू-काश्मीर, लडाख, बेटे आणि ईशान्य भागात महत्वपूर्ण वैद्यकीय सामान आणि रूग्णांची ने-आण करीत आहेत. पवन हंसने 19 एप्रिल 2020 पर्यंत 6537 किलोमीटरचा हवाई प्रवास करत 1.90 टन मालवाहतूक केली आहे. देशांतर्गत लाइफलाइन उडान मालवाहतूकीमध्ये राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार इत्यादीद्वारे मागणी केलेल्या कोविड-19 संबंधित रीएजेंट, एन्जाइम, वैद्यकीय उपकरणे, चाचणी संच, वैयक्तिक सुरक्ष उपकरणे (पीपीई), मास्क, हातमोजे, एचएलएल आणि आयसीएमआरची इतर सामग्री समाविष्ट आहे.

ईशान्य भारत, बेट प्रदेश आणि डोंगराळ राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एअर इंडिया आणि आयएएफ ने प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर, लदाख, ईशान्य भारत आणि इतर बेट प्रांतासाठी सहकार्य केले आहे. बहुतेक मालवाहतूकीमध्ये वजनाने हलके आणि आकाराने मोठी उत्पादने जसे मास्क, हातमोजे आणि इतर उपभोग्य वस्तू ज्या विमानात मोठ्या प्रमानात जागा व्यापतात, अशांचा समावेश होता. योग्य काळजी घेऊन प्रवासी बसण्याच्या ठिकाणी आणि ओव्हरहेड केबिनमध्ये माल ठेवण्यासाठी खास परवानगी घेण्यात आली आहे.

राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) आणि एमओसीए ने लाईफ लाईन उड्डाणामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने एक पोर्टल विकसित केले आहे जेणेकरून विविध हितधारकांमध्ये निरंतर समन्वय साधणे शक्य होईल. लाईफलाईन उडाण विमानांशी संबंधित सार्वजनिक अद्ययावत माहिती https://esahaj.gov.in/lifeline_udan/public_info या पोर्टलवर दररोज उपलब्ध होत आहे.

देशांतर्गत मालवाहतूक विमान कंपनी स्पाईस जेट, ब्लू डार्ट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाईस जेटने 24 मार्च ते 19 एप्रिल 2020 का कालावधीत 6,29,325 किलोमीटर हवाई प्रवास केला असून 3414 टन मालवाहतूक केली आहे. यापैकी 135 आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे होती. ब्ल्यू डार्टने 25 मार्च ते 19 एप्रिल या कालवधीत 1,39,179 किलोमीटर हवाई प्रवास करत 141 देशांतर्गत मालवाहू उड्डाणे केली आहेत आणि 2241 टन मालवाहतूक केली आहे. इंडिगो ने 3-19 एप्रिल 2020 या काळात 37,160 टन मालवाहतूक करत 33 उड्डाणे केली आहेत आणि 66 टन मालवाहतूक केली आहे. यात सरकारसाठी विनाशुल्क वैद्यकीय पुरवठा देखील समाविष्ट आहे.

औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि कोविड-19 मदत साहित्याच्या वाहतुकीसाठी पूर्व आशियासोबत कार्गो एअर-ब्रिजची स्थापन करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे तारखेनुसार वैद्यकीय सामान आणले गेले:

अनु.क्र.

तारीख

ठिकाण

प्रमाण (टन )

1

04.4.2020

शांघाई

21

2

07.4.2020

हॉंगकॉंग

06

3

09.4.2020

शांघाई

22

4

10.4.2020

शांघाई

18

5

11.4.2020

शांघाई

18

6

12.4.2020

शांघाई

24

7

14.4.2020

हॉंगकॉंग

11

8

14.4.2020

शांघाई

22

9

16.4.2020

शांघाई

22

10

16.4.2020

हॉंगकॉंग

17

11

16.4.2020

सेउल

05

12

17.4.2020

शांघाई

21

13

18.4.2020

शांघाई

17

14

18.4.2020

से

14

15

18.4.2020

गुआंगझोउ

04

16

19.4.2020

शांघाई

19

 

 

एकूण

261

 

एअर इंडिया आवश्यकतेनुसार महत्वपूर्ण वैद्यकीय पुरवठ्यांच्या वाहतुकीसाठी इतर देशांमध्ये समर्पित नियोजित मालवाहू उड्डाणे करणार आहे.

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

U.Ujgare/S.Mhatre/P.Kor


(Release ID: 1616430) Visitor Counter : 335