PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


17 गट कोविड-19 वर लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत, 5 गटांनी प्राण्यांवरील अभ्यासाचा टप्पा पूर्ण केला असून मानवावरील परिणाम तपासून पाहात आहेत: ICMR

औषधे व लसींच्या चाचण्यांसंदर्भात काम करण्यासाठी एका उच्च स्तरीय कृती दलाची स्थापना. लस निर्मितीसाठी सर्व मंत्रालयांकडून सुरू असलेल्या कामामधील समन्वयाला हे कृती दल गती देईल: आरोग्य मंत्रालय

Posted On: 19 APR 2020 7:46PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)

नवी दिल्‍ली-मुंबई, 19 एप्रिल 2020

 

Covid-19 च्या संकटाचा उपयोग करून भारताने जगाला एक नवी कार्यसंस्कृती देण्याची गरज आहे तरुणांचा आपला देश यात पुढाकार घेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला या नव्या कार्यसंस्कृती मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुळवून घेण्याची क्षमता, कार्यक्षमता, सर्वसमावेशकता, संधी, वैश्विकता या गोष्टी अभिप्रेत आहेत.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कोविड-19  शी आपला संघर्ष सुरू राहणार असून लॉकडाऊन आणि इतर मार्गदर्शक तत्वांचे प्रामाणिकपणे पालन करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले - गृह मंत्रालय
  • हॉटस्पॉट, क्लस्टर आणि क्षेत्रबंदीमध्ये समाविष्ट नसलेल्या भागांनीही, जेथे लॉकडाउनमधून मुभा देण्यात आली आहे, अशा भागांनीही दक्ष राहिले पाहिजे-असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
  • समुदायांच्या चाचण्या करणाऱ्या वैद्यकीय पथकांना राज्यांनी पुरेशी सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे- गृह मंत्रालय
  • स्थलांतरित मजुरांना त्याच राज्य/ केंद्रशासित प्रदेशात, संमत व्यवसायांमध्ये कामावर उपस्थित राहण्याच्या दृष्टीने प्रवास करण्यासाठी,  गृह मंत्रालयाने SOP म्हणजेच प्रमाणित कृती प्रक्रिया जारी केली आहे.
  • आतापर्यंत 3,86,791 कोविड-2019  चाचण्या करण्यात आल्या आहेत. 37,173 चाचण्या काल केल्या गेल्या. त्यापैकी 29,287 चाचण्या ICMR  नेटवर्कमधील 194 प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या. उर्वरित 7,886 चाचण्या, 82 खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या – ICMR
  • 2,231 लोक बरे झाले आहेत,  बरे होण्याची टक्केवारी  आता 14.19% आहे. गेल्या 24 तासात: 1,334 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद, 27 मृत्यू. कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या- 15,712. एकूण मृत्यू – 507- आरोग्य मंत्रालय
  • गेल्या 28 दिवसांत कोविडचा एकही नवीन रुग्ण न सापडलेल्या माहे (पुदुचेरी) आणि कोडाग्गू/कुर्ग (कर्नाटक) यांखेरीज, 23 राज्य/केंद्रशासित प्रदेशांतील अन्य 54 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही
  • औषधे व लसींच्या चाचण्यांसंदर्भात काम करण्यासाठी एका उच्च स्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. नीती आयोग सदस्य आणि पंतप्रधानांचे  प्रमुख शास्त्रीय सल्लागार या दलाचे सहअध्यक्ष आहेत. लस निर्मितीसाठी सर्व मंत्रालयांकडून सुरू असलेल्या कामामधील समन्वयाला हे कृती दल गती देईल.
  • पंतप्रधानांनी उल्लेख केल्याप्रमाणे, 20 एप्रिलपासून, म्हणजेच आज मध्यरात्रीपासून, क्षेत्रबंदी नसलेल्या भागांमध्ये निवडक बाबींत मुभा देण्यात येईल. हॉटस्पॉट जिल्ह्यांतील भागांत कोणतीही सवलत/मुभा दिली जाणार नाही.
  • स्थानिक गरजांनुसार राज्ये व केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक नियमांपेक्षा जास्त कठोर निर्बंध लागू करू शकतात.
  • हॉटस्पॉट म्हणजे कोविड19 चा मोठा प्रादुर्भाव झालेले भाग, किंवा बऱ्यापैकी संसर्ग झालेले क्लस्टर्स. हॉटस्पॉटच्या अंतर्गत भागात, कोविड2019 च्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, क्षेत्रबंदीचे भाग व बफर झोन यांच्या सीमा ठरविते.
  • क्षेत्रबंदीच्या भागांमध्ये मध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्याची अनुमती दिली जाणार नाही, या संपूर्ण भागात अतिशय कठोर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या भागात केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल.
  • जेथे निवडक मुभा दिलेल्या आहेत अशा भागांत, सध्याच्या लॉकडाउनच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची खबरदारी राज्यांनी व जिल्ह्यांनी घ्यावयाची आहे. तसेच SOP नुसार व्यक्ती-व्यक्तींदरम्यान उचित सामाजिक अंतर राखण्यासाठी उपाय करण्याचीही काळजी त्यांनी घ्यावी
  • प्रवासी वाहतूक
  • शैक्षणिक संस्था
  • औद्योगिक/ व्यावसायिक कामकाज( वगळले नसल्यास) 
  • चित्रपटगृहे, मॉल्स 
  • सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम
  • धार्मिक प्रार्थनास्थळे
  • टॅक्सी आणि कॅब ऍग्रीगेटर्स

या सर्वांवर ३ मेपर्यंत देशभरात बंदी असेल

  • काही कामांना परवानगी देण्यात आली आहे, 'जान भी है, जहाँ भी है या सूत्रासह, हळूहळू सर्व जीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  • कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कार्यान्वित राहतील
  • रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी रोजगारसंधी
  • आरोग्यसेवा
  • अत्यावश्यक वस्तूंसाठी पुरवठा साखळी
  • ज्या भागात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्या भागात सेवा पुन्हा सुरू करताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. कोणत्याही नव्या रुग्णांची भर पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल
  • मुभा देण्याचे निकष गतिशील आहेत; या भागांत कोविड2019 चे नवीन रुग्ण सापडले, तर हेही 'रेड झोन' आणि क्षेत्रबंदीच्या भागांमध्ये समाविष्ट होतील, जेथे लॉकडाउनच्या उपायांची कठोर अंमलबजावणी होत असेल
  • देशात सध्या  समर्पित कोविड हॉस्पिटल्सची संख्या 755 झाली आहे. तर समर्पित कोविड आरोग्य केंद्रांची संख्या 1,389 आहे.
  • त्यामुळे आता आपल्याकडे 2,144 समर्पित सुविधा उपलब्ध झाल्या असून या ठिकाणी तीव्र लक्षणे असलेल्या/अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करता येणार आहेत
  • विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागांत, संसर्गाला अडथळा आणण्यासाठी, मास्क व चेहऱ्याची आच्छादने उपयोगी पडतील. याबाबत मार्गदर्शक सूचना अगोदरच जारी केल्या आहेत. सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी चेहऱ्याची आच्छादने वापरणे बंधनकारक आहे, असे गृहमंत्रालयाने यापूर्वीच सांगितले आहे
  • 17 गट कोविड-19 वर लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत, 5 गटांनी प्राण्यांवरील अभ्यासाचा टप्पा पूर्ण केला असून मानवावरील परिणाम तपासून पाहात आहेत. यातील एक ऑक्सफर्ड वॅक्सीन ग्रुप ChAdOx1 वर काम करत आहे. या गटाने केलेल्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करण्यात येईल.
  • हॉटस्पॉट म्हणजे असे भाग जेथे कोविड2019 ची रुग्णसंख्या अधिक आहे, किंवा संख्या दुप्पट होण्यासाठी 4 दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. राज्यांनी नियमितपणे ती यादी अपडेट करावी, असे निर्देश आहेत. 'रेड झोन अंतर्गत, क्षेत्रबंदीचे भाग ठरवले जातील, जेथे फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल
  • लक्षणे न दिसता पॉझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी नाही. या आव्हानाबाबत सावध असणे. तसेच लक्षणे न दिसणाऱ्या परंतु धोका असणाऱ्या लोकांवर देखरेख ठेऊन चाचण्या करणे, त्यांच्याशी समन्वय राखणे, आणि विलगीकरणाची आवश्यक ती खबरदारी घेणे- हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे.

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  इतर अपडेट्स :

 

महाराष्ट्र अपडेट्स

हिरव्या आणि नारिंगी झोनमध्ये असलेल्या उद्योगांना प्रक्रिया आणि उत्पादन नियंत्रित प्रमाणात सुरू करण्याची राज्य सरकार परवानगी देत आहे. या उद्योगांना त्यांच्या कामगारांसाठी वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. महाराष्ट्रामध्ये 3,648 केसेसची नोंद झाली आहे तर 211 मृत्यू झाले आहेत परंतु त्याच वेळी राज्याने देशात सर्वाधिक म्हणजेच 66,896 चाचण्या केल्या आहेत

 

Fact Check on #Covid19

https://pbs.twimg.com/profile_banners/231033118/1584354869/1500x500

 

***

 

DJM/MC/SP/DR


(Release ID: 1616140)