संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल कोणत्याही मोहिमेसाठी तैनात आणि लढाईसाठी सज्ज
Posted On:
18 APR 2020 10:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020
कोविड -19 ची चाचणी सकारात्मक आल्यानंतर अलगीकरण कक्षात ठेवलेले 26 खलाशी आयएनएस आंग्रे या मुंबईतील किनारा प्रतिष्ठानचे आहेत. भारतीय नौदलाच्या कोणत्याही जहाजावर, पाणबुडीवर किंवा हवाई तळावर कोविड -19 संसर्गाची अद्यापपर्यंत एकही घटना घडलेली नाही. आमची नौदल मालमत्ता तीन आयामांमध्ये मोहीम राबविण्यासाठी तैनात आहे आणि सर्व यंत्रणा आणि हवाई तळावरील मालमत्ता चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. नौदल हे लढाऊ-सज्ज, मोहिमेसाठी सक्षम असूनही साथीच्या आजाराशी लढा देण्याकरिता तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील आमच्या मित्रत्वाचे संबंध असणाऱ्या शेजार्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेत भाग घेण्यास तयार आहे.
पूर्वेकडील मलाक्काच्या सामुद्रधुनीपासून पश्चिमेकडील बाब-अल-मंडेब पर्यंतच्या समुद्री तटबंदीत व्यापलेल्या प्रदेशावर आमची गस्त अजूनही कायम आहे, तसेच आमच्या व्यापारी जहाजांना आणि एडनच्या आखातातील चाचेगिरी विरोधात गस्त घालणाऱ्या पथकांना संरक्षण आणि आश्वासन प्रदान करण्यासाठी ओपी संकल्प हाती घेण्यात आला आहे.
07 एप्रिल रोजी एक खलाशी कोरोना बाधित आढळल्यानंतर पश्चिम नौदल कमांडने संसर्ग झालेल्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी/स्क्रिनिंग सुरु केले त्यामुळे कोविड-19 प्रकरणांचा तपास करणे शक्य झाले. हे सर्व खलाशी अद्यापही बाधित नाहीत आणि सर्वोत्तम वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आयएनएचएस अस्विनी येथे त्यांचे परीक्षण केले जात आहे.
कोविड -19 साठी खलाशाची चाचणी सकारात्मक आल्याने, युनिटचा संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि बफर क्षेत्रे नियुक्त केली गेली आहेत आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वारंवार निर्जंतुकीकरण केले जात आहे.
नौदल परिसरामधील इतर सर्व भागात टाळेबंदीची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येत आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांना विलगीकरण आणि सुरक्षा नियमांचे पालन करायला लावले जात आहे. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे स्क्रिनिंग केले जात आहे.
किनारपट्टी आणि किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी सर्व मोहीम पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. आजाराचा प्रादुर्भाव तात्काळ रोखण्यासाठी 14 दिवसांचा विलगीकरण नियम पाळण्यासाठी आणि नागरी प्राधिकरणाच्या तसेच सागरी तटाशेजारील देशांना मदतीसाठी कार्यकारी विभागांची सज्जता ठेवली आहे.
आमच्या देशवासीयांच्या सोयीसाठी मुंबई, गोवा, कोची आणि विशाखापट्टणम येथे नौदल आवारात अनेक विलगीकरण सुविधा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात,मुंबईत विलगीकरण कक्षात ठेवलेल्या केंद्रशासित प्रदेश लद्दाख आणि जम्मू-काश्मीरमधील 44 माजी इराण यात्रेकरूंची तुकडी, भारतीय नौदलाने घेतलेल्या काळजीमुळे आणि देखभालीमुळे समाधानाने घरी परतली. नौदलाच्या विमानांनी राज्य सरकारांना मदत करण्यासाठी माल आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक केली आहे.
भारतीय नौदलाने अनुभव सामायिक करण्यात सक्रियता दर्शविली आहे आणि आपली मार्गदर्शक तत्वे इतर नौदलांशी सामायिक करण्याच्या उद्देशाने Indian Ocean Naval Symposium (IONS) या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहेत.
या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय नौदल वचनबद्ध आहे आणि सागरी क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी नेहमीप्रमाणेच तत्पर आहे.
B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 1615918)
Visitor Counter : 176