गृह मंत्रालय

निवडक श्रेणी वगळता व्हिसा दिलेल्या सर्व परदेशी प्रवाशांचे तसेच भारतात बाहेरून येणा-यांचे व्हिसा 3 मे, 2020 पर्यंत निलंबित

Posted On: 17 APR 2020 10:45PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

देशात कोविड-19 चा झालेला उद्रेक लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयाने निवडक श्रेणी वगळता व्हिसा दिलेल्या सर्व परदेशी प्रवाशांच्या व्हिसांचे दि. 3 मे, 2020 पर्यंत निलंवन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतामध्ये ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’च्या माध्यमातून प्रवेश करणा-या सर्वांचे व्हिसा 3 मेपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. केवळ राजदूत, अधिकारी, संयुक्त राष्ट्राचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे कर्मचारी आणि प्रकल्प अधिकारी या श्रेणीला यातून वगळण्यात  आले आहे.

भारतामध्ये 107 इमिग्रेशन चेक पोस्टच्या माध्यमातून प्रवेश करता येतो. मात्र दि. 3 मे,  2020 पर्यंत भारतामध्ये या मार्गानेही प्रवेश करता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र जरूरीचे सामान, साधन-सामुग्रीची वाहतूक करणाऱ्या  वाहनांना, विमानांना, जहाजांना बंदी घालण्यात आलेली नाही. मालवाहू साधनांबरोबर असणारा त्यांचा कर्मचारी वर्ग, नाविक,चालक, मदतनीस, क्लिनर अशा लोकांना प्रवेशाची मुभा आहे. मात्र त्यांची कोविड-19ची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्यांना परवानगी देण्यात येणार आहे.

यासंबंधी अधिकृत तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करावे

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1615553) Visitor Counter : 204