इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारत सरकारचा भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क (एसटीपीआय) केंद्रांमध्ये कार्यरत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना 4 महिन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय
Posted On:
16 APR 2020 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2020
कोविड-19 मुळे उद्भवलेली आव्हाने आणि लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेत भारत सरकारने भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क (एसटीपीआय) केंद्रामध्ये कार्यरत छोटे आयटी युनिट्स देत असलेल्या भाड्या संदर्भात एक मोठा निर्णय घेत त्यांना दिलासा दिला आहे. यापैकी बहुतांश युनिट्स हे टेक एसएसएमईएस किंवा स्टार्ट अप्स आहेत.
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 1 मार्च 2020 ते 30 जून 2020 पर्यंत अर्थात 4 महिन्यांच्या कालावधीसाठी एसटीपीआय आवारात असलेल्या या युनिट्सना भाडे माफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीपीआय ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक स्वायत्त संस्था आहे आणि देशभरात याची 60 केंद्रे आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या या संकटाच्या परिस्थितीत या युनिट्सना भाडेमाफी देण्याच्या पुढाकाराने त्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या 60 केंद्रांमध्ये कार्यरत सुमारे आयटी/आयटीईएस, एमएसएमईएस यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. 1 मार्च 2020 ते 30 जून 2020 या चार महिन्यांच्या कालावधीत या युनिट्सना देण्यात येणारी भाडे माफीची एकूण किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे. हा प्रयत्न या युनिट्स वर अवलंबून असणाऱ्या आयटी/आयटीईएस च्या सुमारे 3,000 कर्मचाऱ्यांच्या देखील हिताचा आहे.
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1615133)
Visitor Counter : 205