विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड 19 वर विज्ञान-आधारित संकेतस्थळ सुरु करण्यात आले


‘कोविडज्ञान ' नावाचा हा एक बहु-संस्थात्मक, बहुभाषिक विज्ञान संवाद उपक्रम आहे

Posted On: 13 APR 2020 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020


कोविड -19  ची भीती संपूर्ण  देशाला अतिशय जलद गतीने ग्रासत असताना, देशातील वैज्ञानिक आणि अभियंते या महामारीच्या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी व्यापक प्रमाणात सहकार्य करत आहेत.

कोरोना विषाणूची (सार्स -सीओव्ही -२) नेमकी वृत्ती , कोरोना फ्लूचे संक्रमण, आणि त्याविरुद्ध लढा अधिक व्यापक बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, त्याचे निदान, शारीरिक अंतर राखण्याचे साधन आणि दळणवळणाचे महत्वपूर्ण मूल्यमापन आदींचा यात समावेश आहे. 

या महामारीच्या प्रादुर्भावाचा वैज्ञानिक आणि तथ्यात्मक बाबी सार्वजनिक डोमेनवर आणण्यासाठी ‘कोविडज्ञान’ नावाचा बहु-संस्थात्मक , बहुभाषिक विज्ञान संवाद  उपक्रम तयार करण्यात आला आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) यांच्या संकल्पनेतून याची निर्मिती झाली आहे. त्यानंतर इतर अनेक प्रमुख भागीदार यात सहभागी झाले, यामध्ये विज्ञान प्रसार, इंडियाबायोसायन्स, आणि बंगळुरू लाइफ सायन्स क्लस्टर (बीएलआयएससी) यांचा समावेश आहे , ज्यात इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन (इनस्टेम), सेल्युलर अँड मोलेक्युलर प्लॅटफॉर्म  (सी-सीएएमपी) आणि राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्र (एनसीबीएस).यांचा समावेश आहे. 

या उपक्रमाचा एक परिणाम म्हणजे 03 एप्रिल 2020 रोजी थेट संकेतस्थळ सुरू  करण्यात आले.  कोविडज्ञान या नावाचे हे संकेतस्थळ कोविड -19 च्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून संसाधने संग्रहित करण्यासाठी एक केंद्र म्हणून काम करत आहे. ही संसाधने भारतातील सार्वजनिक समर्पित संशोधन संस्था आणि संलग्न  कार्यक्रमांद्वारे निर्माण केली जातात. येथे मांडण्यात आलेली सामग्री रोगाच्या आणि त्याच्या प्रसाराच्या सर्वोत्तम उपलब्ध वैज्ञानिक आकलनावर अवलंबून आहे.

माहितीचा विश्वासार्ह स्त्रोत असण्याव्यतिरिक्त, या संकेतस्थळाचे प्राथमिक उद्दिष्ट जनजागृती करणे आणि या आजाराचे आकलन करण्यासाठी समग्र दृष्टीकोन आणि तो कमी करण्यासाठी संभाव्य साधन आणणे हा आहे. तसेच कोविड -19  संदर्भातील माहितीच्या ‘गो टू ’ रिपॉझिटरीला देखील ते मदत करेल. ऑडिओ / पॉडकास्ट स्वरूपात, इन्फोग्राफिक्स, पोस्टर्स, व्हिडिओ, एफएक्यूज आणि मिथबस्टर आणि वैज्ञानिक कागदपत्रांच्या दुव्यांसह प्रख्यात वैज्ञानिकांच्या चर्चेद्वारे ‘योग्य माहिती’ अनेकविध पैलूंसह उपलब्ध होईल अशा रीतीने याची रचना केली आहे.

हे माहितीपूर्ण संकेतस्थळ केवळ वापरण्यासाठी अनुकूल नाही तर अस्सल, विश्वासार्ह  देखील आहे. याची सुरुवात झाल्यापासून , वैज्ञानिक समुदायाद्वारे फेसबुक आणि ट्विटर सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ते मोठ्या प्रमाणात सामायिक केले गेले आहे. ते अधिक अष्टपैलू बनवण्यासाठी  विविध भारतीय भाषांमध्ये ते उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

वेबसाइटचा आयडीः https://covid-gyan.in

दरम्यान, आणखी एक नवीन उपक्रम म्हणून, बंगळुरू स्थित - इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन (इनस्टेम) आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (एनसीबीएस) दोन प्रमुख विज्ञान संस्थांच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी  अनेक अंतर्गत संवाद वाहिन्यांची स्थापना केली आहे आणि त्यांच्या कॅम्पससाठी कोविड 19 बाबत असलेली  भीती आणि चिंता दूर करण्यासाठी मदत केली आहे.

या सुविधांमध्ये कॅम्पस ईमेल हेल्पडेस्क, कॅम्पस मेसेजिंग सर्व्हिस, एक फोन हेल्पलाइन आणि एक पीअर सपोर्ट लाइन समाविष्ट आहे,  जी पुढील काही वर्षे  कॅम्पसमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. तरूण संशोधकांच्या गटाने लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी  तसेच विविध अल्पकालीन आणि दीर्घकालीन वैज्ञानिक आव्हानांसह विशिष्ट संशोधन / प्रोग्रामिंग / डिझाइन कौशल्यांची जुळणी करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून विविध स्वयंसेवक गट देखील स्थापन केले आहेत.

(Contact persons –Communications office, Bangalore Life Science Cluster

Amrita Tripathy: tripathya@instem.res.in

Mahinn Ali Khan: mahinnak@ccamp.res.in)

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1614154) Visitor Counter : 665