रेल्वे मंत्रालय
घरोघरची स्वयंपाकगृह सुरळीत सुरु राहण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठबळ मिळण्यासाठी रेल्वेचे महत्वपूर्ण योगदान
Posted On:
13 APR 2020 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020
घरोघरची स्वयंपाकघरे सुरळीत सुरु रहावी आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ते साहित्य नियमित मिळावे यासाठी 1 एप्रिल ते 12 एप्रिल 2020 या गेल्या बारा दिवसांच्या कालावधीत रेल्वेने 36724 वॅगन अन्नधान्याची वाहतूक केली ज्यात 861 वॅगन साखर, 1753 वॅगन मीठ आणि 606 वॅगन/टॅंक खाद्यतेल आणि 14317 वॅगन खतांचा समावेश होता. (एका वॅगनमध्ये 58-60 टन माल होता)
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीच्या काळात धान्य, साखर, मीठ आणि खाद्यतेल यासारख्या शेती उत्पादनांची वेळेवर वाहतूक व्हावी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी भारतीय रेल्वेने हे प्रयत्न केले. एप्रिल 2020 च्या पहिल्या बारा दिवसात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि नियोजित स्थळी तो उतरविणे याकामी रेल्वे सुसाट सुटली आहे.
आगामी खरीप हंगामात खतांची वाहतूक आणि उपलब्धता यासाठी रसायन आणि खत मंत्रालयाशी सातत्याने समन्वय राखला जात आहे. अन्नधान्य वाहतुकीसाठी कृषी मंत्रालयाशी संपर्क साधला जात आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
|
अनुक्रमांक
|
तारीख
|
अन्नधान्याच्या वॅगनची संख्या
|
साखरेच्या वॅगन
|
मिठाच्या वॅगन
|
खाद्यतेलाच्या वॅगन
|
खतांच्या वॅगन
|
|
1
|
1/4/20
|
2343
|
210
|
-
|
-
|
761
|
|
2
|
2/4/20
|
2582
|
-
|
133
|
64
|
1047
|
|
3
|
3/4/20
|
3285
|
41
|
103
|
122
|
1123
|
|
4
|
4/4/20
|
3151
|
42
|
84
|
50
|
996
|
|
5
|
5/4/20
|
2810
|
42
|
165
|
42
|
996
|
|
6
|
6/4/20
|
2730
|
42
|
170
|
14
|
960
|
|
7
|
7/4/20
|
3211
|
105
|
168
|
-
|
1504
|
|
8
|
8/4/20
|
3478
|
84
|
236
|
50
|
1225
|
|
9
|
9/4/20
|
4061
|
64
|
41
|
50
|
1225
|
|
10
|
10/4/20
|
3192
|
63
|
275
|
69
|
1518
|
|
11
|
11/4/20
|
2973
|
42
|
168
|
70
|
1324
|
|
12
|
12/4/20
|
2908
|
126
|
210
|
75
|
1429
|
|
|
एकूण
|
36724
|
861
|
1753
|
606
|
14317
|
लॉकडाऊन सुरू केल्यापासून फळ, भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि शेतीसाठी बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे 13 एप्रिलपर्यंतच्या नोंदीनुसार पार्सल स्पेशल ट्रेन 63 मार्गावर वेळापत्रकानुसार चालवीत आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगलुरू ही देशातील सर्व प्रमुख शहरे जोडण्यासाठी पार्सल स्पेशल्सची योजना आखली गेली आहे. याव्यतिरिक्त, देशाच्या ईशान्य भागात पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गुवाहाटी स्थानकाला योग्य जोडणी देखील सुनिश्चित केली गेली आहे. भोपाळ, अलाहाबाद, देहरादून, वाराणसी, अहमदाबाद, वडोदरा, रांची, गोरखपूर, तिरुअनंतपुरम, सालेम, वारंगल, विजयवाडा, विशाखापट्टणम, राउरकेला, बिलासपूर, भुसावळ, टाटानगर, जयपूर, झांसी, आग्रा, नाशिक, नागपूर, अकोला, जळगाव, सूरत, पुणे, रायपूर, पाटणा, आसनसोल, कानपूर, जयपूर, बीकानेर, अजमेर, ग्वाल्हेर, मथुरा, नेल्लोर, जबलपूर इत्यादी महत्वाची शहरे या गाड्यांमुळे जोडली गेली आहेत.
ज्या ठिकाणी मागणी कमी आहे अशा मार्गावरही गाड्या चालवल्या जात आहेत, जेणेकरून देशातीळ सर्व शहरे जोडली जावीत. सर्व संभाव्य ठिकाणी गाड्यांना थांबा देण्यात आला आहे जेणेकरून जास्तीत जास्त पार्सलचे वितरण होईल.
सर्व राज्य अभियान संचालक आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित सचिवांना रेल्वेद्वारे चालविल्या जाणार्या या गाड्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांची सर्व संसाधने एकत्रित करण्याची विनंती केली गेली आहे. रेल्वे महामंडळाच्या अतिरिक्त सभासद (वाणिज्यिक) यांनी तयारी दर्शविली आहे की जर त्यांना नवीन मार्ग किंवा थांबे यासंदर्भात राज्यांकडून काही मागणी आल्यास ते त्वरित आवश्यक कार्यवाही करतील.
वेगवेगळ्या परिमंडळातील सर्व व्यवस्थापन प्रमाणपत्र प्रणाली / मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापकांची यादी, बुकिंगची प्रक्रिया, या विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि मालाची मोजमाप इत्यादी माहिती सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर पार्सल स्पेशल गाड्यांच्या संदर्भातील तपशिलांसाठी लिंक उपलब्ध आहे. indianrailways.gov.in
पार्सल स्पेशल ट्रेनच्या तपशिलासाठी डायरेक्ट लिंक खालीलप्रमाणे आहेः
https://enquiry.indianrail.gov.in/mntes/q?opt=TrainRunning&subOptsplTrnDtl
U.Ujgare/V.Joshi/D.Rane
(Release ID: 1614146)
अभ्यागत कक्ष : 166