निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशन,नीती आयोग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांच्या सहकार्याने एटीएल शाळांमध्ये सुरु करणार कोलॅबकॅड (ColabCAD)

Posted On: 13 APR 2020 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

अटल इनोव्हेशन, मिशन, नीती आयोग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र या तिघाच्या सहकार्याने 'कोलॅबकॅड' (ColabCAD) साॅफ्टवेअर नावाचे नेटवर्क साॅफ्टवेअर बनवले असून त्यायोगे इंजिनिअरिंगची टू डी ड्राफ्टिंग पासून ते थ्रीडी प्राॅडक्ट पर्यंतची सर्व कामे या नेटवर्क साॅफ्टवेअरवरुन करता येतील. 

देशभरातील अटल टिंकरींग लॅॅब (ATL) मधून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून, वेगवेगळ्या पध्दतीने, या नेटवर्क साॅफ्टवेअरच्या मदतीने थ्रीडी मॉडेल्स बनविता येतील. या साॅफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थ्यांना डेटा बनवता येईल, तसेच तो साठवून ठेवता येऊन एकाचवेळी कुठूनही पाहता येईल.

मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी, तसेच त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना सत्यात आणण्यासाठी देशभरात एटीएल {ATL} शाळा सुरू केल्या आहेत.

अटल इनोव्हेशन-AIM आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र-NIC च्या सहकार्याने बनविण्यात आलेल्या 'कोलॅबकॅड' नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांना, नवनवीन आणि स्वदेशी, अशी साॅफ्टवेअर्स थ्रीडी माॅडेलिंग आणि थ्रीडी स्लायसिंग प्रिंटींग साठी उपलब्ध होतील एटीएलच्या विद्यार्थ्यांच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी, कोलॅबकॅडची विशिष्ट प्रकारची व्हर्जन, बनवण्यात आली असून, त्यायोगे विद्यार्थ्यांना, अमर्यादित पणे, त्यांच्या नवनवीन प्रयोगांना वास्तवात आणता येणे शक्य होईल आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसतील.

"थ्रीडी प्रिंटिंग, हा एकविसाव्या शतकातील महत्त्वाचा नाविन्यपूर्ण भाग असून, पाच हजार अटल टिंकरींग लॅब्सच्या, दोन कोटी पन्नास लाख विद्यार्थ्यांना, कोलॅबकॅडच्या नेटवर्क साॅफ्टवेयरच्या मदतीने रेखाचित्रे बनवण्यासाठी मदत होईल, याचा AIM आणि नीति आयोगाला आनंद होत आहे", असे 'अटल इन्होव्हेशन मिशन' प्रकल्प, नीती आयोग, संचालक श्री.आर.रामानन यांनी कोलॅबकॅड, या प्रकल्पाचे, सामाजिक माध्यमावरून उद्घाटन करतांना म्हटले आहे.

कोलॅबकॅड डिझाईन माॅड्यूल' नावाचे आणखी एक विस्मयकारक माॅड्यूल सुरु करताना मला आनंद होत आहे, या साॅफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थ्यांना विविध प्रकारची अगणित रेखाचित्रे बनवता येतील. विद्यार्थ्यांनी याकाळात आपल्या घरात बसून आपल्या कल्पनाशक्तीचा मूक्त वापर करून, नाविन्यपूर्ण डिझाईन्स बनवावीत, त्याचा उपयोग शाळा सुरू झाल्यानंतरही होईल, अशी मला आशा आहे, असंही श्री. रामानन पुढे म्हणाले.

ह्या आॅनलाईन CAD साॅफ्टवेअरच्या मदतीने, देशभरातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, माहिती पोचवण्यासाठी NIC महत्वाची भूमिका बजावत  आहे.

देशभरातील, पाच हजार अटल टिंकरींग शाळांमधून, हे स्वदेशी थ्रीडी कोलॅबकॅड नेटवर्किंग साॅफ्टवेअर उपलब्ध करताना मला अत्यंत आनंद होत आहे, असं NIC च्या कार्यकारी संचालक डॉ. नीता वर्मा आपले विचार प्रकट करताना म्हणाल्या.

या पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या साॅफ्टवेअरच्या मदतीने आभासी क्षेत्रात थ्रीडी जागेत, तंत्रज्ञ, रेखाचित्रासह संपूर्ण उद्योगाचा आराखडा बनवू शकतील. AIM आणि नीती आयोगाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे साॅफ्टवेअर बनवून संधी उपलब्ध करण्यात, आम्हाला अभिमान वाटत आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

सध्याच्या काळात, ATL ने, 'टिंकर फ्राॅम होम' या प्रकल्पाची सुरुवात केली असून देशभरातील मुलांना, घरात बसून, व्यग्र राहून, आॅनलाईन पध्दतीने, सहज शिक्षण करण्याची सोयही उपलब्ध केली आहे. स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

डेल टेक्नॉलॉजी आणि लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या मदतीने AIM ने एक क्रिडाविकास माॅड्यूल विकसित केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पध्दतीने शिक्षण मिळेल. याद्वारे मुलांना विविध प्रकारचे खेळ स्वतःच बनवून ते इतरांशी खेळताही येऊ शकतील. अशा तऱ्हेने मुलांच्यात, खेळणारे, तसेच खेळ तयार करणारे, असा बदल घडेल.

त्याचप्रमाणे कोलॅबकॅड आणि टिंकर फ्राॅम होम यांच्या माध्यमातून तरुण विद्यार्थ्यांना घराच्या सुरक्षित जागेत, शिकत असतानाच, राष्ट्र बांधणीच्या कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा मिळेल. 

अटल इनोव्हेशन मिशन (AIM) संबंधी……. अटल इनोव्हेशन मिशन, हा, केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अखत्यारीतील, देशात, उद्योगशीलता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची संस्क्रुती निर्माण व्हावी, यासाठी सुरू केलेला गौरवशाली प्रकल्प आहे.

देशातील सर्व जिल्ह्यात अटल टिंकरिंग केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत AIM च्या वतीने, देशातील 33 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील, 14 हजार 916 शाळांमध्ये अटल टिंकरींग केंद्रे सुरू केली आहेत.

 

 

U.Ujgare/S.Patgaonkar/D.Rane


(Release ID: 1614125) Visitor Counter : 220