विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड-19 आव्हानातुन मार्ग काढण्यासाठी इंडो-यूएस विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाचा इंडो-यूएस व्हर्चुअल नेटवर्कवर भर
Posted On:
13 APR 2020 3:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020
कोविड-19 आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आययूएसएसटीएफ अर्थात इंडो-यूएस विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाने प्रस्ताव मागविले आहेत. इंडो-यूएस व्हर्चुअल नेटवर्कमुळे सध्या कोविड वर संशोधन करीत असलेल्या भारतातील आणि अमेरिकेतील वैज्ञानिक आणि अभियंत्यांना सध्याच्या पायाभूत सुविधा आणि निधीच्या तरतुदीत व्हर्चुअल (आभासी) यंत्रणेद्वारे संयुक्तरित्या संशोधन करता येणार आहे. कोविड-19 च्या गंभीर आव्हानांवर मात करण्याचे मार्ग दाखविणारे आणि संशोधनावर भर देणाऱ्या तसेच इंडो-यूएस भागीदारीचे महत्व आणि खात्रीशीर फायदे देणाऱ्या प्रस्तावांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
कोविड-19 सारख्या महामारीवर तसेच भविष्यात येणाऱ्या इतर आरोग्यविषयक आव्हानांवर प्रतिबंधात्मक उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याची, भागीदारीची गरज आहे ज्यात प्रथितयश वैज्ञानिक, अभियंते, उद्योजक एकत्रितपणे काम करतील. हाच विशिष्ट उद्देश ठेवून भारत आणि अमेरिकेतील परस्पर सहकार्याने उपक्रम राबविण्यासाठी अशा सहकार्याला इंडो-यूएस विज्ञान आणि तंत्रज्ञान मंच प्रोत्साहन देत आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात मार्च 2000 मध्ये झालेल्या करारांतर्गत स्थापन झालेली आययूएसएसटीएफ ही एक स्वायत्त द्विपक्षीय संस्था आहे जी संयुक्तपणे अर्थसहाय्यित असून सरकार, शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून विज्ञान- तंत्रज्ञान,अभियांत्रिकी आणि नाविन्यास प्रोत्साहन देत आहे. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अमेरिकेचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग हे दोन मुख्य विभाग आहेत.
"कोविड -19 च्या काळात ठोस उपाययोजनांसाठी विज्ञान प्रभावी ठरत असताना परिणामकारक संवाद, गरजांची ओळख पटविणे, सहयोग, वेग, अनुवादात्मक आणि तंत्रज्ञान विषयक पैलू, पारदर्शकता, उत्तरदायित्व, सामाजिक फायदे आणि समस्येचे निराकरण यासारखे घटक प्रकर्षाने पुढे येत आहेत. आयआयएसएसटीएफला मजबूत सहयोगाच्या माध्यमातून संबंधित तंत्रज्ञानाचा विकास करण्याचा इतिहास आहे आणि त्यामुळे या कृतीसाठी हा एक चांगला मंच आहे, असे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी सांगितले.
कोविड -19 महामारी या जागतिक लढ्यात प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञानी एकत्रितपणे काम करून संसाधने सामायिक करणे अत्यावश्यक आहे. नवीन लसी, उपकरणे, निदान साहित्य आणि माहिती प्रणालीच्या विकासाद्वारे उपाय शोधण्यात तसेच या रोगराईचा सामना करण्यासाठी समुदाय आणि राष्ट्रांना संसाधने उपलब्ध करून द्यायला मदत करण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभाग महत्वपूर्ण भूमिका बजावेल. विविध राष्ट्रांमधील संस्थांनी सहयोग केला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार त्यांचे विचार सामायिक करून जागतिक पातळीवर विज्ञान,अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान-सक्षम मनुष्यबळाच्या विकासाला हातभार लावू शकतात, जे मनुष्यबळ पुढे या महामारीच्या निराकरणासाठी कार्य करू शकेल.
15 एप्रिल 2020 ते 15 मे 2020 या कालावधीत अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील.
[अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या
https://www.iusstf.org/
संपर्कासाठी तपशील:- डॉ. नंदिनी कानन, कार्यकारी संचालक, आययूएसएसटीएफ
Email: nandini.kannan@indousstf.org
Mob: +91-9717957003]
U.Ujgare/V.Joshi/D.Rane
(Release ID: 1613917)
Visitor Counter : 224
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam