विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड – 19 चा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आसाममधील ग्रामीण महिलांनी केली हँन्ड सॅनिटायझर, होममेड मास्कची निर्मिती

Posted On: 13 APR 2020 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या SEED शाखेच्या साहाय्याने सीएसआयआर तसेच नॉर्थ ईस्ट इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जोरहाट अंतर्गत रूरल विमेन टेक्नॉलॉजी पार्क तथा आरडब्ल्यूटीपी तर्फे ग्रामीण भागातील महिलांना हँन्ड सॅनिटायझर, होममेड मास्क तसेच जंतुनाशक द्रावण तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. परिसरातील ग्रामीण भागात कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, ही उत्पादने तयार करणाऱ्यांचे कुटुंबिय आणि गरीब लोकांना, या उत्पादनांचे मोफत वाटप करण्यात आले.  

"कोविड-19 सारख्या आव्हानाचा मुकाबला करताना समाजाचा ठाम सहभाग आणि सहाय्य आवश्यक असते. आजच्या परिस्थितीत जनजागृती निर्माण करण्यासाठी, संबंधित उपाययोजनांबद्दल माहिती देण्यासाठी तसेच मास्क आणि जंतुनाशके अशा बाबींची निर्मिती आणि वितरणासाठी स्वयंसहायता गट आणि समर्पित समाजसेवी संस्थांची भूमिका महत्वाची आहे," असे मत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले.  

जोरहाट येथील आरडब्ल्यूटीपी ने या क्षेत्रातील ग्रामीण महिलांना ‘गमोछा’ (आसाममधील पारंपारिक सूती टॉवेल) पासून होममेड मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या मास्कची रचना निश्चित करण्यात आली, सुमारे 150 गमोछांची खरेदी करण्यात आली आणि २ शिवणयंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. (एका गमोछापासून 6 होममेड मास्क तयार करता येतात.)

प्रत्येक महिलेला प्रत्येक मास्क तयार करण्यासाठी 15 रूपये दिले जातील, असे ठरले. त्याव्यतिरिक्त 200 लिटर जंतुनाशक द्रावण तयार करण्यात आले. त्यासाठी डेटॉल, इथेनॉल, ग्लिसरीन आणि तेल असा कच्चा माल वापरला गेला. हे जंतुनाशक कुटुंबाच्या सदस्यांना तसेच जवळपासच्या गावातील गरीब लोकांना मोफत प्रदान केले जाणार आहे. 

24 मार्च रोजी लॉक डाऊन घोषित होण्यापूर्वी आरडब्ल्यूटीपी तर्फे या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.  त्यात सहभागी महिलांनी 50 लिटर हॅन्ड सॅनिटायझर आणि 160 लिटर जंतुनाशक द्रावण तयार केले, जे सहभागी झालेल्या 60 महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना वितरित करण्यात आले.  कोरोना व्हायरसबाबत माहिती देण्यासाठी तसेच सद्यस्थितीत खबरदारी घेण्यासाठी आसामी भाषेत ‘कोविड – 19 : करा आणि करू नका’ असे सांगणारे फलक आणि पत्रकेही आरडब्ल्यूटीपी तर्फे तयार करण्यात आली आहेत. 

[अधिक तपशिलांसाठी:

श्री. जतीन कलीता, प्रधान वैज्ञानिक, सीएसआयआर-एनईआयएसटी, जोरहाट, ई-मेल kalitajk74[at]gmail[dot]com

मोबाईल: +91-9435557824

डॉ. इंदू पुरी, वैज्ञानिक ‘एफ’, वितंवि, indub.puri[at]nic[dot]in, मोबाईल: 9810557964]

 

 

 

 

B.Gokhale/M.Pange/D.Rane


(Release ID: 1613896) Visitor Counter : 228