पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

जी-20 ऊर्जा मंत्र्यांची असाधारण बैठक

Posted On: 10 APR 2020 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2020

 

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान 10 एप्रिल 2020 रोजी जी-20 ऊर्जा मंत्र्यांच्या असाधारण आभासी बैठकीत सहभागी झाले होते. जी -20 अध्यक्ष पदाच्या क्षमतेत आणि सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलाझीझ यांच्या अध्यक्षतेखाली सौदी अरेबियाने ही बैठक बोलविली होती. या बैठकीला जी-20 देशांचे ऊर्जा मंत्री, अतिथी देश आणि ओपीईसी, आयईए सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख बैठकीला उपस्थितीत होते.

जी-20 ऊर्जा मंत्र्यांनी स्थिर ऊर्जा बाजारपेठेची खात्री देणाऱ्या मार्गांवर आणि उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागणीवर परिणाम होऊन मागणीत घट झाली आहे तसेच चालू असलेल्या अतिरिक्त उत्पादना संबधित अनेक बाबींमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.  

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -20  च्या आव्हानात्मक अडचणींवर मात करण्यासाठी विशेषत: असुरक्षिततेवर मात करण्यासाठी मानव-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

या संदर्भात बोलतांना प्रधान यांनी २३ बिलियन अमेरिकन डॉलरच्या मदत पॅकेजचा भाग म्हणून उज्वला योजनेंतर्गत 80.3 मिलियन गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी सिलेंडर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला अधोरेखित केले. भारत हे जागतिक उर्जेचे मागणी केंद्र होते आणि राहील यावर त्यांनी यावेळी जोर दिला. आमचा धोरणात्मक पेट्रोलियम साठा पूर्ण करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

चालू उर्जा बाजारपेठेच्या चढउतारांच्या संदर्भात मंत्री म्हणाले की, उत्पादकांसाठी वाजवी आणि ग्राहकांना परवडणाऱ्या अशा स्थिर तेल बाजारपेठेसाठी भारताने कायमच समर्थन केले आहे. दीर्घकालीन टिकवासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा बाजूच्या घटकांमध्ये संतुलन साधण्यासाठी ओपेक आणि ओपेक प्लस देशांच्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. उपभोग आधारित मागणी पुनर्प्राप्ती साठी तेलाच्या किंमती परवडणाऱ्या स्तरावर असाव्यात असा आग्रह त्यांनी यावेळी केला.

जी -20 ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत संयुक्त निवेदनाचा अवलंब केला जाईल, ज्यात पुढील टप्प्यांवरील जी -20 ऊर्जा मंत्र्यांना सल्ला देण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये क्रियाशील राहण्याचे मान्य करण्यात आहे.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane


(Release ID: 1613151) Visitor Counter : 212