शिक्षण मंत्रालय

ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत नाविन्यपूर्ण कल्पना मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जाहीर केली आठवडाभराची ‘भारत पढे ऑनलाईन’ मोहिम

Posted On: 10 APR 2020 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2020


 

उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास प्रोत्साहना देणे तसेच त्यासंबधीच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय एकत्र मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आठवडाभराची 'भारत पढे ऑनलाईन मोहिम' आज नवी दिल्ली इथे जाहीर केली. यावेळी बोलताना निशंक म्हणाले “उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन  देणे तसेच हे करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय थेट मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी सामायिक करण्यासाठी भारतातील हुशार व्यक्तींना आवाहन करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे.” आपल्या सूचना/कल्पना आमच्यापर्यंच पोचवण्यासाठी त्या  bharatpadheonline.mhrd[at]gmail[dot]com या ई-मेल आयडीवर पाठवा किंवा ट्विटरवर  # BharatPadheOnline वापरुन  @HRDMinistry किंवा @DrRPNishank यांना 16th April 2020 च्यापूर्वी  टॅग करा. या सुचनांची आपण स्वत: हून दखल घेऊ असं निशंक यावेळी म्हणाले.

 

मेरा आप सभी से निवेदन है कि आप सब मंत्रालय को ऑनलाइन शिक्षा पद्धति को और अधिक प्रभावशाली और रचनात्मक बनाने हेतु अपने सुझाव दें। आप सभी अपने सुझाव #BharatPadheonline का उपयोग करते हुए मेरे @DRPNishank व मंत्रालय के @HRDMinistry टि्वटर अकाउंट में भेज सकतें हैं। #IndiaFightsCorona pic.twitter.com/kdmoZj4mm5

— Dr Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 10, 2020

 

शिक्षक तसेच विद्यार्थी हे या मोहिमेचे  मुख्य लक्ष्य आहे, असे पोखरियाल यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या उपलब्ध डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग विद्यार्थी विविध अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी करत असतात.  सध्याची ऑनलाईन शिक्षण पद्धती अधिक उत्तम व्हावी यासाठी ते या मोहिमेत उत्साहाने सहभागी होतील अशी आशा आपल्याला वाटते, असे पोखरियाल यावेळी म्हणाले. सध्या शालेय विद्यार्थी तसेच उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी उपलब्ध वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे  विविध अभ्यासक्रम शिकण्यासाठी वापरत असतात. या उपलब्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांना ज्या उणीवा जाणवतात त्या ते शेअर करू शकतील तसेच त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल याच्या सूचनाही देता येतील. 

देशभरातल्या  सर्व शिक्षकांनी त्यांचे शिक्षण क्षेत्रातले कौशल्य  आणि अनुभव यांच्यासह योगदान देण्यास पुढे यावे, असे असे त्यांनी म्हटले आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे भारतातील सध्याचे चित्र , तसेच परंपरागत शिक्षण पद्धतीत ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्यावर तोडगा  काढण्यासाठी ऑनलाइन पद्धती कशी उपयुक्त ठरते इथपासून सुरुवात करावी लागेल, असं निशंक म्हणाले.

निशंक यांनी सर्व भारतीयांना देशात ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या विकासासाठी होत असलेल्या एकमेवाद्वितिय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

 
U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane



(Release ID: 1613020) Visitor Counter : 233