पंतप्रधान कार्यालय

महामारी विरोधात लढा देण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी भारत तयार

प्रविष्टि तिथि: 10 APR 2020 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020

 

कोरोना महामारी विरोधात लढा देण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी भारत तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

इस्रायलला क्लोरोक्वीन पुरवण्याच्या भारताच्या निर्णयाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यनाहू यांनी केले आहे, उत्तरादाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. 

या महामारीविरोधात आपण सर्वांनी एकत्रित लढा द्यायचा आहे. आपल्या मित्र राष्ट्रांसाठी, शक्य ती सर्व मदत करायला भारत तयार आहे. इस्रायल मधल्या जनतेच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी आपण प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

 

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1612895) आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam