विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
SCTIMST च्या शास्त्रज्ञांनी निर्जंतुकीकरण कक्ष आणि मास्क विघटन पेटी केली विकसित
“संक्रमण साखळी तोडण्यासाठी व्यक्ती, वस्त्रे, आजूबाजूची जागा आणि साहित्य यांचे निर्जंतुकीकरण महत्वाचे” - प्रा आशुतोष शर्मा, DST सचिव
प्रविष्टि तिथि:
10 APR 2020 2:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020
केरळच्या त्रिवेंद्रम येथील श्री चित्रा तिरुनल वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (SCTIMST), या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कोविड-19 आजाराचा मुकाबला करण्यासाठी दोन तंत्रज्ञान विकसित केले आहेत.
त्यांनी केलेल्या संशोधनानंतर, संपूर्ण व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक वेगळा कक्ष तयार केला आहे. जितीन कृष्णन आणि सुभाष व्ही व्ही या शास्त्रज्ञांनी हा कक्ष विकसित केला आहे. हा एक हायड्रोजन पेरोक्साईड चा फवारा आणि uv आधारित निर्जंतुकिकरण करणारा फिरता कक्ष आहे.

हायड्रोजन पेरोक्साईडच्या फवाऱ्यामुळे व्यक्तीचे शरीर, कपडे, हात असे सगळे एकाच वेळी निर्जंतूक केले जाणार आहे. इलेक्ट्रोनिक पद्धतीने नियंत्रित केलेल्या या कक्षात व्यक्तीने प्रवेश केल्यावर बीपचा आवाज येतो, व्यक्ती आत शिरल्यावर त्याच्यावर हा फवारा उडतो आणि त्यानंतर ही व्यवस्था आपोआप बंद होते. 40 सेकंदात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होते.
याच संस्थेने विकसित केलेले दुसरे तंत्रज्ञान म्हणजे UV म्हणजेच अतिनील किरणे आधारित माक्स विघटन पेटी. रुग्णालयात कोविडच्या रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी आपल्या मास्कचे विघटन करण्यासाठी ही पेटी वापरू शकतात, त्यामुळे, या मास्कचे सुरक्षितरीत्या विघटन होऊन, त्याचा धोका नष्ट होतो.
कोविड-19 ची संक्रमण साखळी तोडण्यासाठी व्यक्ती, वस्त्रे, आजूबाजूची जागा आणि साहित्य यांचे निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे असे मत, DST सचिव प्रा आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले.
U.Ujgare/R.Aghor/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1612889)
आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam