कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यांच्या कृषी मंत्र्यांसमवेत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सला अनुसरून घेतलेल्या निर्णयांची केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना माहिती


पीएसएस अंतर्गत डाळी आणि तेलबिया खरेदी करण्याची तारीख राज्ये ठरवणार

सर्व महत्वाच्या शहरांना फळे, दुध यासारख्या नाशिवंत मालासह आवश्यक वस्तूंचा रेल्वे द्वारे पुरवठा

Posted On: 09 APR 2020 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

कोविड-19 महामारीमुळे सुरु असलेल्या लॉक डाऊनच्या काळात शेतीविषयक  कामे आणि शेतकरी यांच्या संदर्भातल्या मुद्य्यांवर चर्चा करण्यासाठी,केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली.या चर्चेला अनुसरून केंद्र सरकारने  खालील  निर्णय घेतले  असून सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना ते आज कळवण्यात आले आहेत.

पीएसएस, आधारभूत किंमत योजने अंतर्गत डाळी आणि तेलबिया खरेदी सुरु करण्याची तारीख संबंधित राज्ये ठरवू शकतील असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खरेदी सुरु केल्यापासून 90 दिवस खरेदी सुरु राहिली पाहिजे.

नाशिवंत माल आणि फळे भाज्या यांच्यासाठी  किफायतशीर भाव सुनिश्चित करण्यासाठी बाजारपेठ मध्यस्त योजनेचे तपशील, कृषी, सहकारी आणि शेतकरी कल्याण विभागाने, सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिली आहे. राज्यांनी या योजनेची अंमलबजावणी करावी असे सुचवण्यात आले आहे,ज्यामध्ये 50 % (ईशान्येकडच्या राज्यांसाठी 75%)मूल्य केंद्र सरकार सोसणार आहे. आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात तपशीलवार  माहिती देण्यात आली आहे. 

इतर प्रगती

24-3-2020 पासून लॉक डाऊनच्या काळात, प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत,7.92 कोटी शेतकरी कुटुंबाना लाभ झाला आहे, आतापर्यंत 15,841 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.  शेतकरी,एफपीओ,सहकारी संस्था यांच्याकडून, मोठे खरेदीदार,मोठे किरकोळदार यांच्या द्वारे,राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनाला अनुसरून  थेट खरेदी सुलभ करण्यासंदर्भात 4 एप्रिलला राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना सूचनावली जारी करण्यात आली. या सूचनावलीनुसार तमिळनाडू,कर्नाटक आणि झारखंड या सारख्या राज्यांनी कार्यवाही सुरु केली आहे.

फळे-भाज्या, दुध आणि दुग्ध जन्यपदार्थ यांच्या सह नाशिवंत तसेच आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी रेल्वेने 109 पार्सल गाड्या पुरवल्या आहेत.लॉक डाऊन सुरु झाल्यापासून,59 मार्गावर या पार्सल गाड्या मालाची, ठरलेल्या वेळापत्रकानुसार वाहतूक करतात.भारतातल्या जवळ-जवळ  सर्व महत्वाच्या शहरात या रेल्वे गाड्या जलद गतीने या मालाची वाहतूक करतात.ही सेवा आणखी विस्तारण्यात येणार आहे.

ई नाम एप मधे लॉजिस्टिक मोड्यूलची भर घालण्यात आली आहे. शेतकरी,व्यापारी या मोड्यूलचा वापर करत असून 200 पेक्षा अधिक जणांनी याचा उपयोग या आधी सुरु केला आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 


(Release ID: 1612745) Visitor Counter : 237