संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाकडून मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना अन्नधान्याची मदत
प्रविष्टि तिथि:
09 APR 2020 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना मदत म्हणून भारतीय नौदलाने 4 आणि 8 एप्रिल रोजी अन्नधान्याची पाकिटे राज्य प्रशासनाकडे दिली आहेत.
लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना मदत करावी अशी विनंती, 3 एप्रिल 2020 रोजी मुंबई जिल्हाधिकारयांनी भारतीय नौदलाला केली होती. या विनंतीला प्रतिसाद देत, पश्चिम नौदल विभागाने लगेच दुसऱ्याच दिवशी अन्नधान्याची 250 पाकिटे तयार केली. या पाकिटात पुरेसे अन्नधान्य असून ती स्थानिक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
8 एप्रिलला अन्नधान्याची आणखी 500 पाकिटे तयार करुन ती स्थानिक अधिकाऱ्यांना वाटपासाठी देण्यात आली. ही पाकिटे कामाठीपुरा येथे अडकलेल्या मजुरांना दिली जाणार आहेत.
U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1612705)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada