नागरी उड्डाण मंत्रालय

कोविड – 19 वर मात करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी विमान कंपन्या तसेच संबधित संस्थांचे अथक प्रयत्न सुरूच


योग्य सुरक्षा उपाययोजनांसह वैद्यकीय माल वितरीत

Posted On: 09 APR 2020 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

कोविड – 19 लॉकडाऊन कालवधी दरम्यान, संपूर्ण देशभर आयसीएमआर, एचएलएल आणि इतर कंपन्यांच्या आवश्यक मालासह आवश्यक वैद्यकीय माल निरंतर वितरीत केला जात आहे. एअर इंडिया, आयएएफ, पवनहंस, इंडिगो आणि ब्ल्यू डार्ट यासारख्या देशातील सार्वजनिक आणि खाजगी विमान कंपन्यांनी 8 एप्रिल 2020 रोजी श्रीनगर, कोलकत्ता, चेन्नई, बंगळूरू, भुवनेश्वर आणि देशातील इतर भागांमध्ये औषधे, आयसीएमआर माल, एचएलएल माल आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. देशभरातील लोकांना आवश्यक वैद्यकीय पुरवठा करण्याच्या एकत्रित हेतूची पूर्तता करण्याच्या उद्देशाने नागरी उड्डयन मंत्रालय आरोग्य मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, टपाल विभाग इत्यादींच्या मालवाहतुकीसाठी समन्वय साधत आहे. याव्यतिरिक्त माल संकलनापासून ते वाहतुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इच्छित स्थळी माल वितरीत करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुरक्षेच्या शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

कोविड – 19 लॉकडाऊन दरम्यान लाईफलाईन उडाण सेवेद्वारे सुमारे 248 टन मालवाहतूक करण्यात आली आहे. आतापर्यंत लाईफलाईन उडाण अंतर्गत 167 विमानांनी 1,50,006 किलोमीटर अंतरावर उड्डाणे करण्यात आली आहेत

S.No.

Date

Air India

Alliance

IAF

Indigo

SpiceJet

Total flights operated

1

26.3.2020

02

--

-

-

02

04

2

27.3.2020

04

09

01

-

--

14

3

28.3.2020

04

08

-

06

--

18

4

29.3.2020

04

10

06

--

--

20

5

30.3.2020

04

-

03

--

--

07

6

31.3.2020

09

02

01

 

--

12

7

01.4.2020

03

03

04

--

-

10

8

02.4.2020

04

05

03

--

--

12

9

03.4.2020

08

--

02

--

--

10

10

04.4.2020

04

03

02

--

--

09

11

05.4.2020

--

--

16

--

--

16

12

06.4.2020

03

04

13

--

--

20

13

07.4.2020

04

02

03

--

--

09

14

08.4.2020

03

--

03

 

 

06

 

Total Flights

56

46

57

06

02

167

 

एअर इंडिया आणि आयएएफने प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत आणि इतर बेटांसाठी मालवाहतूक करण्यासाठी सहकार्य केले आहे.

8 एप्रिल 2020 रोजी एअर इंडियाने कोलंबोला 3.76 टन माल वितरीत केला. आवश्यकतेनुसार गंभीर वैद्यकीय उपकरणांच्या आयातीसाठी एअर इंडिया अन्य देशांमध्ये नियोजित समर्पित मालवाहू उड्डाणे करणार आहे.

देशांतर्गत मालवाहतूकदार; ब्ल्यू डार्ट, स्पाइसजेट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाईसजेटने 24 मार्च ते 8 एप्रिल 2020 पर्यंत 2,99,775 किलोमीटर हवाई अंतर पार करुन 1805.6 टन मालवाहतूक केली. यापैकी 61 आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उड्डाणे होती. ब्ल्यू डार्टने 70 देशांतर्गत मालवाहतूक उड्डाणे केली असून 67,273 किलोमीटरचा हवाई प्रवास केला आहे आणि 25 मार्च ते 8 एप्रिल 2020 पर्यंत 1,075 टन मालवाहतूक केली आहे.

इंडिगोने देखील 3 ते 8 एप्रिल 2020 दरम्यान 15 मालवाहतूक उड्डाणे करत 12,206 किलोमीटरचा हवाई प्रवास करून 4.37 टन मालवाहतूक केली आहे.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1612628) Visitor Counter : 204