विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) - एनसीएल (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) पुणे यांनी वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) शी केला करार


तयार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाईनचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, संपूर्ण भारतातील उत्पादकांना विनामूल्य उपलब्ध

Posted On: 09 APR 2020 12:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

सीएसआयआरची घटक प्रयोगशाळा, सीएसआयआर-एनसीएल पुणे, गेल्या दशकभरात आपल्या नवोन्मेष केंद्राच्या (व्हेंचर सेंटरच्या) माध्यमातून नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यात अग्रेसर आहे आणि या केंद्रातून आलेल्या नवकल्पना कोरोना प्रादुर्भावाविरोधात लढण्यात मदत करीत आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यात मदत करणारी अलीकडील दोन नाविन्यपूर्ण संशोधने प्रकाशित करण्यात आली आहेतः

  1. डिजिटल (आयआर) इन्फ्रारेड थर्मामीटर: सीएसआयआर-एनसीएलच्या व्हेंचर सेंटरने प्रतीक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील बिमेक कंपनीच्या सहयोगाने हाताने डिजिटल इन्फ्रारेड थर्मामीटर विकसित केला आहे जो कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीच्या उपायांचा एक महत्त्वाचा घटक आहे. मोबाइल फोन किंवा पॉवर बँकांचा उर्जा स्त्रोत म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. देशभरातील उत्पादकांना तयार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह आयआर थर्मामीटरचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन करण्यासाठी डिझाईन विनामूल्य उपलब्ध आहे. ज्याद्वारे उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर या थर्मामीटरचे उत्पादन करून त्यांची स्थानिक गरज भागविण्यास मदत होणार आहे. आता बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे) यांच्या भागीदारीत त्याचे उत्पादन वाढविण्यात आले आहे. टीयूव्ही राईनलँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बंगलोर येथे प्रायोगिक स्तरावर वितरण आणि चाचणीसाठी सुमारे 100 प्रायोगिक उपकरणे तयार केली जातील.
  2. दुसरा नवोन्मेष म्हणजे ऑक्सिजन पातळी वाढविणारे उपकरण (ओईयू): कोव्हीड -19  रूग्णांच्या तातडीच्या गरजांपैकी एक म्हणजे त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करणे. वातावरणातील ऑक्सिजन पातळी 21-22% ते-38-40% पर्यंत  वाढविण्यासाठी ऑक्सिजन संवर्धन उपकरण (OEU) सीएसआयआर-एनसीएल आणि जेनिरिक मेम्ब्रेन या स्टार्ट-अप नवोन्मेष केंद्राचे संस्थापक आणि एनसीएलचे पॉलिमर विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे  प्रमुख डॉ. उल्हास खरुल यांनी विकसित केले आहे. घर आणि रुग्णालयात रूग्णांना पुरेशा  ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी वातावरणीय हवेचे पृथक्करण आणि गाळण करणारी प्रायोगिक तत्त्वावरील उपकरणे पुण्यात तयार आहेत आणि चाचणी / प्रमाणीकरणासाठी टीयूव्ही राईनलँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बेंगळुरू येथे पाठविली जातील. एनसीएल बीईएलतर्फे पुण्यात सुमारे 10 ओईयू उपकरणे बसविली जातील आणि चाचण्या नंतर त्यांचे प्रमाण वाढविण्यात येईल.

पाच, इन्फ्रारेड नॉन कॉन्टॅक्ट थर्मामीटर पुणे पोलिस उपायुक्त, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.

 

पुण्याजवळ प्रायोगिक तत्त्वावरील चाचणी दरम्यान वैद्यकीय केंद्रात रुग्णाच्या मास्कला जोडलेले जेनिरिक-एनसीएल ऑक्सिजन पातळी वाढविणारे मशीन.

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 



(Release ID: 1612462) Visitor Counter : 254