विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 च्या तपासणीसाठी पुणे येथील स्टार्टअप ने ‘जलद निदान संच’ (रॅपिड डायग्नोस्टिक किट) विकसित केला


“कोविड-19 चाचणीतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे गती, खर्च, अचूकता आणि देखभाल किंवा वापराच्या जागी उपलब्धता” – प्रा. आशुतोष शर्मा, सचिव डीएसटी

Posted On: 08 APR 2020 2:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020

 

फास्ट सेन्स डायग्नोस्टिक हे स्टार्टअप 2018 मध्ये सुरु झाले जे रोगाच्या जलद निदानासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करतात, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे या स्टार्ट अप ला अर्थसहाय्य दिले जाते. हे स्टार्ट अप सध्या कोविड-19 च्या शोधासाठी दोन मॉड्यूल विकसित करत आहे.

 “कोविड-19 चाचणीतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे गती, खर्च, अचूकता आणि देखभाल किंवा वापराच्या जागी उपलब्धता” हे आहे. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक स्टार्ट अपने सर्जनशील आणि अभिनव मार्ग विकसित केले आहेत. तांत्रिक स्तरावर त्या योग्य वाटल्या तर व्यापारीकरणाच्या दृष्टीने सुलभरीत्या त्यांचा विकास व्हावा यासाठी डीएसटी यातील सर्वात होतकरू लोकांना पाठिंबा देत आहे. असे डीएसटी चे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी सांगितले.  

कर्करोग, यकृताचा आजार आणि नवजात बालका संबधी आदी जटील आजारांच्या जलद शोध आणि तपासणीसाठी त्यांच्या विद्यमान “ओम्नी सेन्स” या सार्वभौम व्यासपीठाच्या आधारे कंपनीने विशेषतः कोविड-19 साठी कोव्ह-सेन्स तंत्रज्ञानाचा प्रस्ताव दिला आहे. कोव्ह-सेन्ससाठी पेटंट दाखल केले गेले आहे जे तपासणी आणि प्रामाणिकरण चाचणीसाठी तसेच ऑपरेशन सुलभतेसह जलद तपासणी प्रदान करेल.

कंपनीची दोन उत्पादने आणण्याची योजना आहे. 1. विद्यमान शोध पद्धतींच्या तुलनेत कमी वेळेत पुष्टीकरण विश्लेषणासाठी सुधारित पॉलिमरेझ शृंखला प्रतिक्रिया (पीसीआर) आधारित शोध संच (एका तासामध्ये अंदाजे 50 नमुने तपासले जाऊ शकतात) आणि 2. ऑन-चिप सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित लक्ष्य लोकसंख्येच्या जलद तपासणीसाठी एक पोर्टेबल चिप आधारित मॉड्यूल असेल जे 15 मिनिटांपेक्षा कमी वेळात प्रत्येक नमुन्याची तपासणी करून त्याचे परिणाम देईल. भविष्यात प्रमाणित चाचण्यांसाठी नमुना आकार देखील प्रती तास 100 नमुन्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

फास्ट सेन्स डायग्नोस्टिकचे निदान संच जागेवर आणि जलद निदान परिणाम प्रदान करतील ज्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या चाचणी प्रयत्नांना प्रोत्साहन प्राप्त होईल.

प्रस्तावित दोन मॉड्यूल विमानतळ, दाट लोकवस्तीचे क्षेत्र, रुग्णालये अशा कोणत्याही वास्तविक ठिकाणी आणि हॉटस्पॉट्सवर तैनात केले जाऊ शकतात जेथे निरोगी व्यक्तींमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांची तपसणी केली जाऊ शकते आणि एका तासापेक्षा कमी वेळात आपल्याला सहज माहिती उपलब्ध होऊ शकते. हे अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी कंपनी याचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने काम करत आहे.

ही टीम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीबरोबर काम करण्याची योजना आखत आहे. कामगिरीच्या मूल्यांकनासाठी औपचारिक मान्यता प्रक्रिया चालू आहे आणि हे उपकरण मोठ्या प्रमाणत बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी ते बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.

Figure-1: Schematic of CovE-Sens functioning

 

यावर कार्य करणार्‍या पथकात विषाणूशास्त्र, आण्विक जीवशास्त्र आणि बायोइन्सेस्ट्रेंशन या तज्ञांचा समावेश आहे जे  8 ते 10 आठवड्यात नमुना देऊ शकतात. उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीकडे काही अंतर्गत सुविधा देखील आहेत.

या व्यतिरिक्त, सध्याच्या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासोबतच, पोर्टेबल जलद निदान संच नियमित देखरेखीद्वारे भविष्यात होणारे पुनरावर्तन देखील प्रतिबंधित करेल. कमी खर्च आणि सुलभ हाताळणी यामुळे सहजरीत्या ग्रामीण लोकांपर्यंत याची मदत पोहोचू शकते आणि यामुळे शहरी आरोग्य पायाभूत सुविधांवर अधिक भार पडणार नाही.

 (अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ. प्रीती निगम जोशी, संस्थापक संचालक फास्टसेन्स डायग्नोस्टिक्स,  preetijoshi@fastsensediagnostics.com ,  मोबाईल : 8975993781)

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor


(Release ID: 1612213) Visitor Counter : 265