विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोरोना विषाणूच्या जनुकीय अणुक्रमांकावर भारतीय संशोधकांचे काम सुरु
Posted On:
08 APR 2020 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020
नोवेल कोरोना विषाणू हा एक नवीन विषाणू आहे आणि संशोधक त्यातील सर्व भिन्न बाबी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी), हैदराबाद आणि इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी), नवी दिल्ली या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन केंद्र (सीएसआयआर) च्या दोन संस्थानी नोवेल कोरोना विषाणूच्या संपूर्ण जनुकीय अनुक्रमांवर एकत्र काम करण्यास सुरवात केली आहे.
“या विषाणूची उत्क्रांती, त्याची गतिशीलता आणि त्याचा प्रसार समजण्यास आम्हाला मदत करेल. हा अभ्यास आम्हाला तो विषाणू किती झपाट्याने विकसित होत आहे आणि त्याची भविष्यातील लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेण्यास मदत करेल," असे सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी इंडिया सायन्स वायर डीएसटीच्या वरिष्ठ वैज्ञानिक ज्योती शर्माशी बोलताना सांगितले.
डॉ. मिश्रा म्हणाले की, संपूर्ण जनुकीय अनुक्रम ही विशिष्ट जीवांच्या जनुकांचा संपूर्ण डीएनए अनुक्रम निर्धारित करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. नोवेल कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे नमुने गोळा करून ते परीक्षणासाठी अनुक्रम केंद्रात पाठविणे हा या पद्धतीचा दृष्टिकोन आहे. जनुकीय सिक्वेन्सींग अभ्यासासाठी खूप मोठ्या संख्येने नमुने आवश्यक आहेत. जास्त माहितीशिवाय आपण कोणताही निष्कर्ष काढला तर कदाचित योग्य होणार नाही. या क्षणी आमच्याकडे काही अनुक्रम आहेत आणि ते साधारण काही शेकड्यात उपलब्ध झाले की मग आपण या विषाणूच्या अनेक जैविक बाबींवरून बरेच अनुमान काढू शकू.
प्रत्येक संस्थेतील तीन ते चार लोक संपूर्ण जनुकीय अनुक्रमांकावर सातत्याने कार्यरत आहेत. पुढील 3 ते 4 आठवड्यात संशोधकांना कमीतकमी 200 ते 300 अलगाव मिळू शकतील आणि ही माहिती त्यांना या विषाणूच्या वर्तनाबद्दल काही निष्कर्ष काढण्यास मदत करेल. या उद्देशाने पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेला वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगळ्या पद्धतीने दूर ठेवलेले विषाणू देण्याची विनंती केली आहे. यामुळे शास्त्रज्ञांना देशभरातील व्यापक आणि स्पष्ट चित्र मिळविण्यासाठी मदत होईल. विषाणूच्या उत्पत्तिस्थानाची माहिती मिळविता येईल, ज्या आधारे कच्चे दुवे ओळखून अलगीकरणासाठी निश्चित धोरण विकसित करता येईल, असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त संस्थेने चाचणीची क्षमताही वाढविली आहे. मोठ्या संख्येने लोकांची चाचणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांची तपासणीही होईल. याद्वारे बाधित रुग्णांची संख्या ओळखण्यास आणि नंतर त्यांना विलगीकरणासाठी पाठविण्यात मदत मिळेल.
U.Ujgare/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1612188)
Visitor Counter : 325
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam