संरक्षण मंत्रालय

कोरोना विषाणू (COVID-19) विरोधातील लढ्यात भारतीय हवाई दलाकडून सहकार्य कायम

Posted On: 07 APR 2020 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020


भारतीय हवाई दलाने कोरोना विषाणू विरूद्ध आपले सहकार्य सुरु ठेवत या साथीच्या रोगाचा प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने सामना करण्यासाठी राज्य सरकारे आणि सहाय्यक संस्थांना सुसज्ज करण्यासाठी वैद्यकीय पुरवठा करत आहे.

गेल्या काही दिवसात भारतीय हवाई दलाने नोडल पॉइंट्सवरून ईशान्यभागातील मणिपूर, नागालँड आणि गंगटोक येथे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक वैद्यकीय सामुग्री आणि वस्तुंचा विमानाने पुरवठा केला. याशिवाय एएन -32 विमानाद्वारे 06 एप्रिल 2020, रोजी ओदिशामध्ये चाचणी प्रयोगशाळा आणि सुविधांची उभारणी करण्यासाठी चेन्नईहून भुवनेश्वरला आयसीएमआरचे कर्मचारी आणि 3500 किलो वैद्यकीय उपकरणे यांची वाहतूक केली.

भारतीय हवाई दलाने कोविड-19 विरूद्ध उपायांना समर्थपणे पाठिंबा देण्यासाठी अतिशय कमी वेळेत वैद्यकीय सामुग्री आणि उपकरणे पुरवण्यासाठी नोडल पॉइंट्सवर विमान तैनात ठेवले आहे.

 

U.Ujgare/S.Kane/D.Rane
 



(Release ID: 1612078) Visitor Counter : 145