रसायन आणि खते मंत्रालय

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजने (पीमबीजेपी) अंतर्गत 'स्वास्थ के सिपाही' रूग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक सेवा आणि औषधांचे घरपोच वितरण

Posted On: 07 APR 2020 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020

 

प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे “स्वास्थ के सिपाही” या नावाने प्रसिद्ध औषधविक्रेते, भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनौषधी परीयोजने (पीएमबीजेपी) अंतर्गत रुग्णांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अत्यावश्यक सेवा आणि औषधे वितरीत करतात. प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचा (पीएमजेएके) एक भाग म्हणून काम करत असतानाच, कोरोना साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी हे स्वास्थ के सिपाही देशातील सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना परवडणाऱ्या दरात चांगल्या दर्जाची जेनेरिक औषधे उपलब्ध करून आवश्यक सेवा वितरीत करतात. यामाध्यमातून ते सरकारच्या सामाजिक अंतराच्या उपक्रमाला पाठबळ देत आहेत. 


पीएमजेके, भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालय, औषधनिर्मिती विभागांतर्गत कार्यरत भारतीय फार्मा पीएसयुएस ब्युरो द्वारे हा उपक्रम राबविला जात असून गरजवंताला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा पुरविणे हा याचा उद्देश आहे. सध्या देशभरातील 726 जिल्ह्यांमध्ये 63000 पीएमजेके कार्यरत आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी संपूर्ण देशभरात 14 एप्रिल 2020 पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. 

अशावेळी, अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून ती गरजू लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यामध्ये सर्व पीएमजेएकेएस महत्वाची भूमिका बजावतात.  एका “स्वास्थ के सिपाही” ने त्याला आलेला अनुभव सांगितला, बीपीपीआय ने नुकतीच याबाबत माहिती दिली. पीएमबीजेके, पहाडिया, वाराणसी येथे एका वृद्ध महिलेने फोन करून मदत मागितली. औषधविक्रेत्याच्या म्हणण्यानूसार  ती  महिला वाराणसी येथे तिच्या पती सोबत एकटीच राहते आणि तिची दैनंदिन औषध संपली होती. या औषधांचे नियमित सेवन करणे तिच्या शारीरिक आरोग्यासाठी फार गरजेचे होते. तो औषध विक्रेता स्वतःला त्या दांपत्याला मदत करण्यापासून थांबवू शकला नाही. त्या महिलेने सांगितल्या प्रमाणे त्याने सर्व औषधे गोळा केली आणि तो ती औषधे त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी निघाला. तेव्हापासून आमचा हा औषध विक्रेता आजारी आणि वृद्धांच्या घरी औषध पोहोचवत आहे. 

गुरूग्राममधील एक केंद्रीय गोदाम, गुवाहाटी आणि चेन्नई येथे दोन प्रादेशिक गोदामे आणि सुमारे 50 वितरक देशभरातील सर्व केंद्रांना औषधांचा अतिरिक्त पुरवठा करण्याच्या दिशेने काम करत आहेत. औषधाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी, साठा संपण्याची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये म्हणून एसएपी आधारित एन्ड टू एन्ड पॉईंट ऑफ सेल्स सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना निकटचे जनौषाधी केंद्र शोधण्यासाठी आणि औषधांच्या किंमतीसह त्यांची उपलब्धता तपासण्यासाठी “जन औषधी” हे मोबाईल अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर व आय-फोन स्टोअर वरून डाउनलोड करता येईल. 

लॉकडाउन काळात, लोकांना कोरोना विषाणू पासून स्वतःचे रक्षण करण्यास मदत होईल यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनौषधि परियोजन (पीएमबीजेपी) त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती पोस्टद्वारे जनजागृती करीत आहे. आपण फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मिडीयावर आम्हाला @pmbjpbppi द्वारे फॉलो करून ताजी माहिती मिळवू शकता.

 

 

B.Gokhale/ S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1612033) Visitor Counter : 265