PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

कोविड-19 विरुदध सुरू असलेला आपला लढा अंधश्रद्धा, अफवा यांच्यामुळे कमकुवत होऊ नये, याची काळजी घेण्याचा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांचा इशारा

Posted On: 06 APR 2020 6:43PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001ZTPU.jpg

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours and Fact checks undertaken by PIB)

Text Box: •	As of now, 3374 confirmed COVID-19 cases and 79 deaths have been reported in the country.•	Cabinet Secretary directs all DMs to ensure that the Pharma units for manufacturing medicines & medical equipment are smoothly run.•	Prime Minister and US President agree to resolutely and effectively combat COVID-19.•	HRD Minister asks Universities to use online digital mediums for academic programmes.•	Employees of Finance Ministry and institutions/banks under it contribute over Rs 430 Crore towards PM CARES Fund.

दिल्‍ली-मुंबई, 6 एप्रिल 2020

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवर पत्रकार परिषद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आणि गरीब कल्याण योजनेचे लाभ विनाअडथळा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील हे पाहण्याचे आणि त्यावर देखरेख ठेवण्याचे संबंधित मंत्रालयांना आवाहन केले.  

कोविड-19 विरुदध सुरू असलेला आपला लढा अंधश्रद्धा, अफवा यांच्यामुळे कमकुवत होऊ नये, याची काळजी घेण्याचा इशारा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी दिला. अफवा पसरणे, खास करुन समाजमाध्यमांवरील चुकीची माहिती हा विषाणूच असल्याचे ते म्हणाले. सत्य माहिती सुलभपणे मिळत असूनही अफवा किंवा चुकीच्या माहितीला आळा बसत नसल्याची चिंता त्यांनी फेसबुक पोस्टवर व्यक्त केली आहे

खासदारांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन कायदा 1954 मध्ये सुधारणा करून 1 एप्रिल 2020 पासून एक वर्षासाठी वेतनात 30% कपात करण्याच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. कोविड-19 महामारीवर मात करण्यासंदर्भात यात निर्णय घेण्यात आले.
  • विलगीकरण सुविधा निर्माण करण्याबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, कोविड-19ची लक्षणे तसेच संशयितांना वेगळे ठेवण्यासाठी प्रामुख्याने ही तत्त्वे आहेत.
  • कोविड-19शी लढा देताना निर्माण झालेल्या टाकाऊ वस्तू आणि कचऱ्याची हाताळणी, विल्हेवाट याबाबत आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे आणली आहेत.
  • कोविड-19शी लढा देताना, लोकांमध्ये निर्माण होत असलेला ताण आणि चिंता कमी करण्यासाठी, मंत्रालयाने काही व्हिडिओ जारी केले आहेत.
  • ग्रामीण स्वयं-सहाय्यता प्रशिक्षणामार्फत तोंड आणि चेहरा यासाठी फेस कव्हर शिवण्याबाबत राज्यांना आणि राज्य ग्रामीण उपजीविका मिशन याना ग्रामीण विकास मंत्रालयाने पत्र लिहिले आहे, हे फेस कव्हर, मास्क पेक्षा वेगळे आहे, आणि आधी सांगितल्याप्रमाणे केवळ आरोग्याची काळजी म्हणून आणि जंतूंसाठी अडथळा म्हणून याचा उपयोग आहे.
  • गेल्या 13 दिवसात, भारतीय रेल्वेने, 1342 वॅगन साखर, 958 वॅगन मीठ आणि 378 वॅगन/टाक्या खाद्य तेलाची वाहतूक केली आहे.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत, देशाच्या सर्व भागातल्या अन्नधान्याच्या आवश्यकतेची दखल घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशभरात, 16.94 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची वाहतूक केली गेली.
  • या अंतर्गत, भारतीय अन्न महामंडळाने, आतापर्यंत 13 राज्यात 1.38 लाख मेट्रिक टन गहू, आणि 8 राज्यात 1.32 लाख मेट्रिक टन तांदूळ मंजूर केला आहे, 4 एप्रिल पर्यंत, भारतीय अन्न महामंडळाकडे, सेंट्रल पूल मध्ये 55.47 दशलक्ष मेट्रीक टन अन्नधान्याचा साठा आहे.
  • कोविड-19 संदर्भात सहाय्यकारी कामांसाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राज्य आपत्ती सहाय्य निधीचा वापर करण्याबाबत राज्यांना याआधीच सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय एनएचएम अंतर्गत, जारी करण्यात आलेल्या 1100 कोटी व्यतिरिक्त, आणखी 3000 कोटी रुपये आज जारी करण्यात आले - आरोग्य मंत्रालय
  • व्हेंटिलेटर, N95 मास्क आणि पीपीई खरेदी यासारखे लॉजीस्टिक संबंधित प्रयत्न केंद्र सरकार कडून सुरू असून अशी साधने राज्य सरकारांना पुरवण्यात येत आहेत.
  •  कोविड -19 मधून एकूण 291 व्यक्ती बऱ्या झाल्या. गेल्या 24 तासात 693 नव्या बाधितांची नोंद; 30 जणांचा मृत्यू. एकूण 4,067 जणांना लागण, त्यापैकी 1,445 जण तबलीग जमातशी संबंधित आहेत. एकूण मृत्यू 109.
  • बाधितांपैकी

76% पुरुष, 24% महिला

47% व्यक्ती 40 वर्षाखालील

34% व्यक्ती 49-60 वयोगटातील

19% व्यक्ती,60 वर्षावरील

  • कोविड -19 मुळे मृत्युमुखी पडलेल्यांमधे

73% पुरुष, 27% महिला

63% मृत्यू, 60 वर्षावरील व्यक्तींचे

30% व्यक्ती, 40-60 वयोगटातल्या

7% मृत्यू, 40 पेक्षा कमी वयोगटातील

 

  • कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या 86% व्यक्ती, हृदयाशी संबंधित विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड रोग यांनी आधीच ग्रस्त असल्याचे आढळले आहे.

· कोविड-19 संबंधित देशातली आकडेवारी पाहता असे दिसून येते की - वयोवृद्ध व्यक्तींना याचा सर्वात जास्त धोका आहे इतर व्याधी असलेल्या तरुण वर्गालाही याचा धोका आहे. वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेची काळजी घेऊया, युवा वर्गानेही, 'सोशल डिस्टनसिंग'सह इतर खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

· कोविड-19 ची प्रसार साखळी तोडण्यासाठी, सोशल डिस्टनसिंग आणि लॉकडाऊन हे प्रभावी उपाय असल्याचा आणि कोविड-19शी लढा देण्यासाठी आपण एकत्रित काम करण्याच्या गरजेचा, पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आहे, 'तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्हाला मदत करा' अशी विनंती आम्ही करत आहोत.

· राज्ये, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत, आवश्यक वस्तू आणि सेवा याबत परिस्थिती समाधानकारक आहे, केंद्र सरकार, राज्य सरकारांशी समन्वय साधत, परिस्थिती वर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

·  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, मेडिकल ऑक्सिजन चे महत्व अधोरेखीत करण्यासाठी आणि त्याचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, गृह सचिवांनी, राज्यांना पत्र लिहिले आहे, त्याच बरोबर, पुरवठा साखळी सुरळीत राहावी यासाठीची मार्गदर्शक तत्वेही पुरवण्यात आली आहेत

· आरोग्य मंत्रालय आणि राज्ये यांच्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून, 25,500हून अधिक, तबलीग जमात कार्यकर्ते आणि त्यांच्या संपर्कातल्या व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे; याशिवाय, हरियाणातल्या ज्या 5 गावात, विदेशी नागरिक असलेले तबलीग जमात कार्यकर्ते वास्तव्याला होते, ती गावे सील करण्यात आली असून कार्यकर्त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

· आतापर्यंत 2,083 विदेशी तबलीग जमात कार्यकर्त्यांची ओळख केली असून 1,750 जणांचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

  • अँटीबॉडी आधारित जलद ब्लड टेस्टसाठी, आयसीएमआरने, 5 लाख चाचणी संचाची ऑर्डर दिली आहे, येत्या 8 ते 9 एप्रिलपर्यंत, 2.5 लाख संच मिळतील अशी अपेक्षा आहे.

 

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Other updates:

महाराष्ट्रातील अपडेट्स

महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 781 झाली आहे. आज यात 33 रुग्णांची वाढ झाली आहे.

***

  

        

 

 

DJM/RT/MC/DR


(Release ID: 1611815)