उपराष्ट्रपती कार्यालय

कोविड-19 वरच्या चुकीच्या माहितीचा विषाणू त्वरीत रोखला पाहीजे -उपराष्ट्रपती


अंधश्रद्धा आणि सांगोवागी/अफवा यांना आपला नोवेल कोरोनाविषाणूविरोधातला लढा कमकुवत करायला देऊ नये

सोशल डिस्टन्सिंग गांभिर्यांने घेण्याची निकड सर्व धार्मिक समूहांनी समजून घेणे आवश्यक आहे

समूदायांबद्दल सरसकट विधाने स्पष्टपणे टाळली पाहिजेत

पुढच्या फळीतील लढवय्ये , विशेषत वैद्यकिय व्यावसायिक यांचे संरक्षण अत्यंत महत्वाचे- उपराष्ट्रपती

Posted On: 06 APR 2020 1:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

कोविड-19 विरुदध सुरू असलेला आपला लढा अंधश्रद्धा, अफवा यांच्यामुळे कमकुवत होऊ नये याची काळजी घेण्याचा इशारा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी दिला. अफवा पसरणे  खास करुन समाजमाध्यमांवरील चुकीची माहिती हा विषाणूच असल्याचे  ते म्हणाले.

सत्य माहिती सुलभपणे मिळत असूनही अफवा किंवा चुकीच्या माहितीला आळा बसत नसल्याची चिंता  त्यांनी फेसबुक पोस्टवर व्यक्त केली आहे. संकटाच्या तीव्रतेबाबत अर्धवट वा चुकीचे आकलन  आपल्याला विषाणूंविरोधी लढ्यात  विजय मिळवून देऊ शकणर  नाही , असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या  नियमांचे काही राज्यात वरवर उथळ पालन केल्याचा आणि नवी दिल्लीत नुकताच झालेला मेळावा  याचा उल्लेख करुन उपराष्ट्रपतींनी नियमांचा सर्वत्र प्रसार आणि कडक पालन यांची आवश्यकता अधोरेखित केली.

जात, पंथ, भाषा, ठिकाण तसेच धर्म या कोणत्याही कारणाने सामाजिक पातळीवरचे सामूहिक कार्यक्रम टाळणे हा विषाणूप्रसार रोखण्याचा मार्ग असल्याचा पुरेसा वैज्ञानिक पुरावा आहे. आणि म्हणूनच ते अत्यंत महत्वाचे असल्याबद्दल जमजागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोशल डिस्टंसिंगचे नियम गांभिर्याने घेण्याची गरज असल्याची जाणीव सर्व धर्माच्या नागरिकांना असायला हवी आणि या आव्हानावर मात केल्याखेरीज कोणतेही धार्मिक मेळावे भरवता कामा नयेत, असे मत नायडूंनी व्यकत केले आहे. त्याचसोबत नियमांचे असे दुर्देवी आणि थेट उल्लंघन यापुढे होणार नाही अशी आपल्याला खात्री असल्याचे त्यांना नमूद केले आहे.

तसेच कोणत्याही समुदायाकडे उगाचच सर्वसामान्यपणे एकाच सरधोपट दृष्टीकोनातून बघणे तसेच  कोणत्याही घटनेला पूर्वग्रहदूषित रंग देणे टाळायला हवे असे आवाहन त्यांनी केले आहे.

विषाणू विरोधी लढ्यासाठी सर्व राज्यसरकारे तसेच नागरी सेवा आणि  खाजगी क्षेत्र करत असलेल्या उपाययोजनांचा उल्लेख करून माणुसकीच्या दृष्टीकोनातून सुरू असलेल्या कामांना प्रोत्साहन देण्याची आणि अस्थायी कामगारांचे कष्ट कमी करण्यावर  भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली  आहे.

सुगीचा हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्ये तत्पर आहेत तसेच या हंगामादरम्यान सर्व गोष्टीं नीट पार पडाव्यात आणि पीक हाती लागावे यासाठी सर्व तऱ्हेच्या उपाययोजना केल्या जात आहेत असे त्यांनी नमूद केले आहे.

हा शांत बसण्याचा काळ नाही तसेच यापुढेही कठीण परीक्षेचा काळ आहे असं म्हणत नायडू यांनी आपण दक्ष राहून सदैव तत्परतेने या संकटाशी एकत्र सामना करू असे आवाहन केले आहे. एकत्र विचार कृती आणि सैनिकांमध्ये असलेला दृढनिश्चय ही आता काळाची गरज असल्याचं ते म्हणाले.

आघाडीवर राहून या संकटाशी मुकाबला करणाऱ्यांचे, विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांची सुरक्षा आणि त्यांच्याप्रती आदर हे आपले धेय्य गाठण्यासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले. आपण जणू एखाद्या अंधार्‍या बोगद्यातून सध्या प्रवास करत आहोत. या प्रवासाचा चांगला शेवट करण्यासाठी सद्सद्विवेक, चांगली कृती, सद्भावना आणि मानवी दुःख कमी करण्यासाठी ठाम कृती यांची सध्या गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1611631) Visitor Counter : 207