अर्थ मंत्रालय

कोविड-19 वर मात करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, वित्तीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका /उपक्रमांनी पीएम केअर्स निधीत 430 कोटी रुपयांचे योगदान दिले

Posted On: 05 APR 2020 5:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

कोविड-19 साथीच्या आजाराचा संसर्ग झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मंत्रालयांतर्गत, येणाऱ्या वित्तीय संस्थाचे अधिकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका/उपक्रमांचे अधिकारी यांनी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत (सीएसआर) आपला एक दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीला देण्याचे ठरविल्यानंतर 430.13 कोटी रुपयांचे योगदान या निधीत दिले आहे.

भारतात कोविड-19 साथीचा आजार उद्भवल्या नंतर 28 मार्च 2020 रोजी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सहाय्य आणि मदत पंतप्रधान निधीची (पीएम केअर्स निधी) स्थापना करण्यात आली. हा समर्पित राष्ट्रीय निधी कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन किंवा संकटाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि संसर्ग झालेल्या लोकांना मदत करण्याच्या प्राथमिक उद्देशाने स्थापन करण्यात आला आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1611494) Visitor Counter : 154