शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय विद्यालय संघटनेकडून ऑनलाईन शिक्षण उपक्रम

Posted On: 05 APR 2020 7:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

कोविड-19, धोक्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल “निशंक” यांनी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थांच्या प्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार, केंद्रीय विद्यालय संघटनेने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विविध ऑनलाईन आणि डिजिटल पद्धती अवलंबल्या आहेत. त्यांनी आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवतील अशा विविध स्त्रोतांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.

 

केव्हीएस शिक्षकांचे उपक्रम

कोविड -19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जबाबदार शिक्षक आणि मार्गदर्शक या नात्याने केन्द्रीय विद्यालय संघटनेचे शिक्षक मोठ्या संख्येने पुढे आले आहेत आणि अभ्यासाचा बहुमूल्य वेळ भरून काढण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहेत.

केव्हीएसने सर्व मुख्याध्यापकांसमवेत शक्य तितक्या अंमलबजावणीसाठी काही कृती योजना सामायिक केल्या आहेत, जेणेकरून सर्व शिक्षकांना डिजिटल पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यास प्रोत्साहन मिळेल. शिक्षकांकडून घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन वर्गांसाठी एक अत्यावश्यक प्रोटोकॉल देखील बनविला आहे.

 

एनआयओएस प्लॅटफॉर्म वापरणे

केव्हीएसने 7 एप्रिल 2020. पासून सुरू होणाऱ्या त्यांच्या स्वयम प्रभा पोर्टलमधून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गासाठी एनआयओएसच्या रेकॉर्ड आणि लाइव्ह प्रोग्राम्सचे वेळापत्रक सामायिक केले आहे.

शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात व्यापक प्रसार व्हावा, यासाठी ही माहिती सर्व विद्यालयांपर्यंत पोहचवली गेली आहे. या कार्यक्रमाद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शिक्षकांना ई-मेल, व्हाट्सएप, एसएमएस सारख्या विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

थेट परस्पर संवादांसाठी शिक्षक नामनिर्देशित

केव्हीएसने एनआयओएस द्वारा स्वयंप्रभा पोर्टल येथे आयोजित केलेल्या लाइव्ह सेशनसाठी काही निवडक शिक्षकांची नेमणूक केली आहे.स्काइप आणि लाइव्ह वेब चॅटद्वारे विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी. नामांकित शिक्षकांचा तपशील सर्व प्रादेशिक कार्यालयांबरोबर सामायिक केला गेला आहे.

हे नामनिर्देशित शिक्षक त्याच दिवशी सकाळच्या सत्रात प्रसारित आशयावर अतिरिक्त माहिती/नोट्स तयार करतील जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या शंकांचे थेट सत्रात निरसन होऊ शकेल आणि जर लाइव्ह सत्रादरम्यान शंका येत नसतील तर प्राध्यापक त्या आशयाची पुनरावृत्ती करतील. किंवा पीपीटी / योग्य शिक्षण सहाय्यांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतील.

विविध उपलब्ध संसाधनांचा वापर

एनआयओएस आणि एनसीईआरटी ऑनलाइन धडे देण्याबरोबरच टीव्हीवर देखील कार्यक्रम प्रक्षेपित करणार आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -

1. मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (मूकस ): माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सर्व प्रमुख विषयांमध्ये मैसिव ओपन ऑनलाइन कोर्सवरील एनआयओएस अभ्यासक्रम उपलब्ध आहे, याची लिंक - https://swayam.gov.in/nc_details/NIOS

 

2. फ्री टू एयर डीटीएच चैनलः

 DTH Channel no. 27 (Panini)

 https://www.swayamprabha.gov.in/index.php/program/current/27 (Secondary)

 DTH Channel no. 28 (Sharda)

 https://www.swayamprabha.gov.in/index.php/channel_profile/profile/28 (Sr. Secondary)

 

3. Youtube Channels:

https://www.youtube.com/channel/UC1we0IrHSKyC7f30wE50_hQ (Secondary) https://www.youtube.com/channel/UC6R9rI-1iEsPCPmvzlunKDg (Senior Secondary)

https://www.youtube.com/channel/UC1we0IrHSKyC7f30wE50_hQ (Secondary) https://www.youtube.com/channel/UC6R9rI-1iEsPCPmvzlunKDg (Senior Secondary)

4. किशोर मंचः इयत्ता 9- 12 विद्यार्थ्यांसाठी स्वयंप्रभा चैनल नंबर 31 अंतर्गत एनसीआयआरटीची 24X7 डीटीएच दूरचित्रवाणी वाहिनी

याशिवाय विविध मंचावर NROER, DIKSHA, SWAYAM PRABHA, NPTEL , e-pathshaala यासारखे निशुल्क ई-संसाधन उपलब्ध आहेत.

 

U.Ujgare/S.Kane/P.Kor



(Release ID: 1611491) Visitor Counter : 138