ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

कोविड-19च्या उद्रेकामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत भारतीय अन्न महामंडळाने संपूर्ण देशभरात अन्नधान्याचा भरघोस पुरवठा केला


24 मार्च पासून सुरु असलेल्या लॉकडाऊनपासून एकूण 352 रॅक्समधून अंदाजे 9.86 एलएमटी अन्नधान्य पोहोचवण्यात आले

Posted On: 05 APR 2020 7:06PM by PIB Mumbai

 

भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) लॉकडाऊन कालावधी दरम्यान संपूर्ण देशभरात गहू आणि तांदळाच्या पुरवठ्यात कुठेच खंड पडणार नाही हे सुनिश्चित करत आहे. एफसीआय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएफएसए) प्रत्येक लाभार्थ्याला केवळ प्रत्येक महिन्याला 5 किलो अन्नधान्यपुरविण्याऐवजी  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 81.35 कोटी लोकांना पुढील 3 महिन्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे 5 किलो अन्नधान्याची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी देखील तयार आहे. 31 मार्च 2020 पर्यंत एफसीआय ने 56.75 दशलक्ष एमटी अन्नधान्य (30.7 एमएमटी तांदूळ आणि 26.06  एमएमटी गहू) पुरविले आहे.

या आव्हानात्मक परिस्थितीत देखील एफसीआय देशभरात बहुतांश रेल्वे मार्गाने गहू आणि तांदळाच्या पुरवठ्याची गती वाढवून अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.  1 एप्रिल 2020 रोजी सुमारे 1.48 लाख मेट्रिक टन अन्नधान्य साठा असलेले 53 रॅक्स लोड करण्यात आले. लॉकडाउनच्या दिवसापासून म्हणजेच 24 मार्च 2020 पासून एफसीआयने अंदाजे 9.86 एलएमटी अन्नधान्याचे 352 रॅक्सची वाहतूक केली आहे.

एफसीआय खुल्या बाजारपेठ योजनेंतर्गत (ओएमएसएस) ई-लिलाव करत आहे जेणेकरून बाजारात पुरवठा मर्यादित होऊन पीठ गिरण्या/राज्यसरकारला सुलभरीत्या गहू उपलब्ध होईल. 31 मार्च 2020 रोजी झालेल्या अखेरच्या ई-लिलावात 1.44 एलएमटी गव्हासाठी बोली प्राप्त झाली आहे.

कोविड-19 चा उद्रेक पाहता, नियमित ई-लिलावाशिवाय जिल्हा दंडाधिकारी / जिल्हाधिकारी यांना ओएमएसएस कडून राखीव दराने थेट एफसीआय डेपोमधून पीठ गिरण्या आणि इतर गहू उत्पादनाच्या गरजा भागविण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मार्गाने आतापर्यंत 79027 मे.टन गहू खालील राज्यात देण्यात आला आहे.

अनु.क्र.

राज्य

प्रमाण (एमटी मध्ये)

I

उत्तरप्रदेश

35675

ii

बिहार

22870

iii

हिमाचल प्रदेश

11500

iv

हरयाणा

4190

V

पंजाब

2975

vi

गोवा

1100

vii

उत्तराखंड

375

viii

राजस्थान

342

 

त्याशिवाय तांदळासाठी ई-लिलावही घेण्यात आला आहे. मागील ई-लिलावात 31 मार्च 2020 रोजी तेलंगणा, तामिळनाडू, जम्मू-कश्मीर इत्यादी राज्यांकडून 77000 मे.टन तांदळासाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत.

आतापर्यंत खालील 6 राज्यांना 93387 मेट्रिक टन (एमटी) तांदूळ देण्यात आला आहे.

अनु.क्र.

राज्य

प्रमाण (एमटी मध्ये )

I

तेलंगणा

50000

ii

आसाम

16160

Iii

मेघालय

11727

Iv

मणिपूर

10000

V

गोवा

4500

Vi

अरुणाचलप्रदेश

1000

 

G.Chippalktti/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1611474) Visitor Counter : 132