शिक्षण मंत्रालय
कोविड-19च्या विरुद्धच्या लढाईसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या विविध संस्था, स्वायत्ता संघटना,विभागांच्या वतीने पीएम केअर्स निधीमध्ये 38.91 कोटींपेक्षा जास्त योगदान
प्रविष्टि तिथि:
05 APR 2020 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020
कोविड-19 विरुद्धच्या लढाईसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या विविध 28 संस्था,स्वायत्त संघटना आणि विभाग यांच्या वतीने ‘पीएम केअर्स’ निधीमध्ये आत्तापर्यंत 38.91 कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे. कोविड-19च्या विरोधात भारताला मजबूत बनवण्यासाठी सर्वांकडून होत असलेल्या प्रयत्नांचे मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी कौतुक केले आहे. मनुष्य बळ विकास मंत्रालय कोविड-19 च्या विरुद्ध भारताले सुरू केलेल्या लढ्याला सर्वतोपरी पाठिंबा देत आहे, असे निशंक यांनी म्हटले आहे.
याआधी मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी आपले एक महिन्याचे वेतन आणि एक कोटी रुपये एमपीएलएडी निधी पीएम केअर्सला दान दिला आहे. तसेच पीएम केअर्स निधीमध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व संस्था आणि स्वायत्त संघटनांना केले आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत विविध संस्था, स्वायत्त संघटना, विभागांनी दिलेल्या योगदानाचा तपशील जाणून घेण्यासाठी कृपया इथे क्लिक करावे.
U.Ujgare/S.Bedekar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1611431)
आगंतुक पटल : 128