रेल्वे मंत्रालय

लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांसाठी साखर, मीठ आणि खाद्यतेल पुरवठ्याची भारतीय रेल्वेची ग्वाही

Posted On: 05 APR 2020 3:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

कोविड -19 मुळे देशभरात लॉकडाऊन असताना सर्वसामान्यांच्या वापरासाठी साखर, मीठ आणि खाद्यतेलाची कमतरता भासू नये यासाठी भारतीय रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या काळात या जीवनावश्यक वस्तू मालडब्यात चढविणे आणि उतरविण्याचे तसेच त्यांच्या वाहतुकीचे काम जोरात सुरू आहे.

23 मार्च ते 4 एप्रिल २०२० या गेल्या 13 दिवसांत रेल्वेने 1342 वॅगन साखर,  958 वॅगन मीठ आणि खाद्यतेलच्या  378 / वॅगन / टाक्या भरून त्याची वाहतूक केली. (एका  वॅगनमध्ये  58-60 टन माल भरला जातो).

 

मालवाहतुकीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र.

दिनांक

साखरेच्या वॅगन

मिठाच्या वॅगन

खाद्यतेलाच्या वॅगन

1.

23.03.2020

42

168

-

2.

24.03.2020

-

168

50

3.

25.03.2020

42

42

-

4.

26.03.2020

42

42

-

5.

27.03.2020

42

42

-

6.

28.03.2020

126

42

50

7.

29.03.2020

210

42

42

8.

30.03.2020

252

8

-

9.

31.03.2020

293

84

-

10.

01.04.2020

210

-

-

11.

02.04.2020

-

133

64

12.

03.04.2020

41

103

122

13.

04.04.2020

42

84

50

 

एकूण

1342

958

378

 

मालवाहतुकीवर वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष असते. मालाची चढ-उतार करताना यापूर्वी रेल्वेला विविध स्थानकांवर भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल परिणामकारकरीत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्यासाठी भारतीय रेल्वे  ही गृह मंत्रालयासह, राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे.

 

 

U.Ujgare/V.Joshi/P.Kor



(Release ID: 1611362) Visitor Counter : 158