संरक्षण मंत्रालय

दक्षिणी नौदल कमांडने बिगर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे

Posted On: 04 APR 2020 7:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020

 

दक्षिण नौदल कमांडच्या कोविड कोर कार्यकारी गटाने युद्ध क्षेत्र शुश्रुषा सहकाऱ्यांनी (बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट) (बीएफएनए बिगर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत अनेक कामे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रशिक्षण कॅप्सूल तयार केले आहे. कमांड वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या कोर गटात, आयएनएस वेंदूरुथी आणि आयएनएचएस संजीवनीचे कमांडिंग अधिकारी आणि कमांड प्रशिक्षण अधिकाऱ्यांचा समावेश आहे यांनी बीएफएनए संकल्पनेचा वापर करत हा लहान प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे. 
या सोप्या प्रशिक्षण कार्यक्रमात बिगर-वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी हातांची स्वच्छता, पीपीई घालणे आणि काढणे, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन संकल्पना आणि संक्रमित व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जाणे या बाबींचा समावेश आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमात संसर्ग रोखण्यासाठी सुलभ धोरणाचा देखील समावेश करण्यात आला आहे. 
आपत्कालीन परिस्थितीत अनेक कामे हाताळणाऱ्या बिगैर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दक्षिण नौदल कमांडच्या सर्व युनिटमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम सक्रियपणे सुरु आहे. दक्षिण नौदल कमांडमध्ये आतापर्यंत 333 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

 

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1611207) Visitor Counter : 172