ग्रामीण विकास मंत्रालय

कोविड-19: स्वयंसहायता गटांनी बनविले 132 लाखांहून अधिक फेस मास्क

Posted On: 04 APR 2020 1:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल, 2020

   

ग्राम विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत देशातील 24 राज्यातील 399 जिल्ह्यांमधील स्वयंसहायता गटांतील महिलांनी चेहऱ्याला लावण्याचे मास्क बनविले आहेत. आंध्र प्रदेशमधील 5 जिल्ह्यातील 4281 स्वयंसहायता गटातील 21,028 सदस्यांनी 25,41,440 तर तामिळनाडूमधील 32 जिल्ह्यातील 1927 स्वयंसहायता गटातील 10,780 सदस्यांनी 26,01,735 मास्कची निर्मिती केली आहे.  

बिहार, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अनेक ईशान्येकडील राज्यातील स्वयंसहायता गटही मास्कच्या निर्मितीत गुंतले आहेत. 14,522 स्वयंसहायता गटांच्या एकूण 65,936 सदस्यांनी 132 लाख मास्कची निर्मिती केली आहे. 

महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातील 602 स्वयंसहायता गटातील 2558 सदस्यांनी 24 मार्च 2020 ते 3 एप्रिल 2020 या कालावधीत 3,62,332 मास्कची निर्मिती केली आहे.

 

मास्क निर्मिती करणाऱ्या राज्यांचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

U.Ujgare/V.Joshi/D.Rane
 



(Release ID: 1611001) Visitor Counter : 183