गृह मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या लढयात 21 दिवसांच्या लॉकडाऊन कालवधीत सामाजिक अंतर ठेवत पेरणी आणि कापणीची कामे सुगम पद्धतीने सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालायचे राज्यांना पत्र

Posted On: 03 APR 2020 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

 

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने पेरणी आणि कापणीचा हंगाम लक्षात घेत कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील 21 दिवसांच्या लॉकडाऊन कालवधीत बंदी घातलेल्या कामांमधून शेतीच्या कामांना वगळण्याबाबत सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत.

(https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1608644).

या सूचनेमध्ये, शेतकरी आणि शेतमजुरांनी शेतात काम करणे, शेतमालाची खरेदी, बाजारपेठांमधील कामे, पेरणी आणि कापणी संदर्भातील यंत्रांची ने-आण आदी कामांना परवानगी देण्यात आली आहे.

वगळण्यात आलेल्या कामांचा पुन्हा उल्लेख करत, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून 21 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत शेतीच्या कामांना परवनगी दिल्याचे सर्व संबधित क्षेत्रीय संस्थांना सूचित करण्यास सांगितले आहे. सामाजिक अंतर ठेवत पेरणी आणि कापणीची कामे सुगम पद्धतीने सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यांसोबतचा पत्रव्यवहार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 


(Release ID: 1610869) Visitor Counter : 275